हिंगणघाट व पुलगाव येथील वाळुमाफीयांना पोलिस अधिक्षकांचा परत एकदा दणका,घाटावरुन २.५ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त…

वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या माहीतीवरुन वडनेर पोलिस,देवळी पोलिस तसेच विशेष पथकाने कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैद्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी  तहसिलदार सतीश सदाशिव मसाळ (वय 43 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप क्र.- 245/2024, 780/2024 कलम – 379, भा.दं.वि.सहकलम 48(8),48(7) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या माहितीनुसार दिं(१३) चे पहाटे ३ वा. चे सुमारास मौजा दारोडा शिवारात अवैद्य गौण खनिजाचा उपसा चालू आहे अशा मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाने,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील कर्मचारी व अधिकारी,पोलिस स्टेशन देवळी येथील ठाणेदार व  कर्मचारी,पोलिस स्टेशन समुद्रपुर ठाणेदार व कर्मचारी,पोलिस स्टेशन,वडनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने नमुद घाटावर छापा टाकला असता त्याठिकाणी वाळुचा उपसा करण्यासाठी लागणारे खालीलप्रमाणे जप्त करण्यात आले व  सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला



या छाप्यात पोलिसांनी 1) टिप्परचा चालक सुनील अभीराम आजने (वय 40 वर्षे), रा.निंबी तालुका, मोर्शी, जिल्हा.अमरावती , 2) टिप्पर व पोकलेन मालक आशिष सावरकर, रा.पुलगाव, 3)विनाक्रमांकाचा पोकलेन चालक लवकेश शिवचरण उईके (वय 24 वर्षे) रा.बुधवारी चौक शिवनी, मध्य प्रदेश, 4) विनाक्रमांकाची पोकलेन चालक नखेराम( उज्जैन भोपाल (वय 25 वर्ष), रा.तालुका जुना देव, जिल्हा.छिंदवाडा, मध्य प्रदेश , 5) विना क्रमांकाचा पोकलेन चा चालक भारत राम राजवंशी (वय 29 वर्षे), रा.पकळी, तालुका सिकंदरपुर, जिल्हा – बलिया, उत्तर प्रदेश,यांना ताब्यात घेतले असुन 6) पंकज वानखेडे, रा.हिंगणघाट 7) जीप चा चालक मंगेश सावरकर रा.पुलगाव आदींवर कारवाई करण्यात आली असुन घटनास्थळावरुन 1) टिप्पर क्र. एमएच 27 बीएक्स 8166 किं.500000/- ज्यामध्ये रेती किं.40000/- रु. 2) बिना क्रमांकाचे तीन पोकलेन प्रति 5000000/- रु. प्रमाणे 15000000/- 3) रेती काढण्याकरता इंजिन बोट 6 नग 600000/- रु. असा एकूण 20640000/- रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. तसेच यातील मुख्य आरोपी १) आशिष सावरकर,पुलगाव २) पंकज वानंखेडे,हिंगणघाट ३)मंगेश सावरकर,पुलगाव हे फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे



सदरची धडाकेबाज कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सार्थक नेहते,पोलिस स्टेशन देवळी पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे,वडनेर,सहा पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर,समुद्रपुर,सहा पोलिस निरीक्षक संजय मिश्रा,विशेष पथकाचे सहा पोलिस निरीक्षक मंगेश भोयर तसेच पथकातील कर्मचारी तसेच पोलिस स्टेशन हिंगणघाट,समुद्रपुर,देवळी,वडनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!