पुलगाव येथील दारु तस्कर माठा याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
पुलगांव शहरातील कुख्यात दारु तस्कराविरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई…
पुलगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होणार्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे मुख्यत्वे करुन दारु व्यवसाईकांवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी निर्गमित केले होते
त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगांव शहरास आणि आजुबाजुच्या गावागावात मोठया प्रमाणात अवैधरीत्या देशी, विदेशी, गावठी मोहा
दारुची अमरावती जिल्हयातुन तस्करीच्या मार्गाने दारुचा पुरवठा करुन त्याची विक्री करणाऱ्या कुख्यात दारु विक्रेता दिनेश
नारायणदास माठा, वय ३७ वर्षे, रा. सिंदी कॉलनी, कॅम्प रोड, पुलगांव, ता. देवळी, जि. वर्धा याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी
कायदा १९४९ अन्वये सन २००४ ते २०२४ पावेतो पोलिस स्टेशन पुलगांव जि. वर्धा चे अभिलेखावर एकुण २३ गुन्हयांची नोद
आहे. ज्यामध्ये मोठया प्रमाणात गावठी मोहा दारु, देशी विदेशी मदयाची सिमावर्ती अमरावती जिल्हयातुन प्रतिबंधीत वर्धा
जिल्हयात चार चाकी वाहनाने तस्करी करुन पुलगांव तसेच आजुबाजुच्या परिसरात त्याची विक्री करण्याकरीता पुरवठा करीत
होता तसेच स्वतः सुध्दा त्याचे राहते घरी विक्री करीत होता. मागील ३ वर्षाचे कालावधी मध्ये दिनेश माटा याचे ताब्यातुन ५ चारचाकी, ३ दुचाकी वाहनासह ९ गुन्हयामध्ये एकुण २८,४३,४००/- रु. ची देशी, विदेशी, गावठी मोहा तसेच अतिशय महागडया दारु सूध्दा जप्त करण्यात आलेली होती. त्याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा त्याचे दारु तस्करीवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. ज्यामुळे पोलिस स्टेशन पुलगांव परिसरातील सार्वजनीक स्वास्थावर विपरीत परिणाम झाला होता. सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती.
त्यानुसार तत्कालीन पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, प्रमोद बानबले यांनी एम.पि.ङि ए. कायदयान्वये स्थानबध्द प्रस्ताव तयार करुन
उपविभागिय पोलिस अधिकारी, पुलगांव राहुल चव्हान यांनी योग्यरीत्या पाठपुरावा करुन स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक नूरुल हसन, यांचे मार्फतीने मा.जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डीले, यांना सादर करण्यात आला होता. सदर स्थानबध्द प्रस्तावाची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेवुन तसेच आगामी होवु घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ लक्षात घेता. लोकसभा निवडणुका २०२४ हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभन मुक्त वातावरणात पार पाडाव्यात याउद्देशाने मोठया प्रमाणात अवैधरीत्या दारुची तस्करी करुन विक्री करणाऱ्यावर आळा घालण्याकरीता स्थानबध्दतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आलेला असुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द ठेवण्यात आलेले आहे. तसेच पुढे होवु घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ लक्षात घेता, लोकसभा निवडणुका निर्भीड वातावरणात तसेच विना प्रलोभणाने पार पाडण्याचे उद्देशाने येणाऱ्या काही कालावधी दरम्यान अशा दारु विक्रेत्यावर तसेच गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यावर कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.
सदरची कारवाई. पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, राहुल चव्हाण, उप विभागीय पोलिस अधिकारी, पुलगांव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, ठाणे प्रभारी अधिकारी,पुलगांव. राहुल सोनवणे, सहा. पोलिस उप निरीक्षक संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा अमोल आत्राम, स्था.गु.शा. वर्धा,हाडके, महादेव सानप, विनोद रघाटाटे, पो.स्टे. पुलगांव यांनी केली