उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने पकडला विदेशी दारुचा साठा…
रात्र पेट्रेलिंग व नाकाबंदी दरम्यान उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने पकडला विदेशी दारुसाठा, कारसह ८,२२०००/- रु मुदेमाल केला जप्त…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व देश ,राज्य ,शहर हे अयोघ्या येथील प्रभुरामाच्या प्रतिस्थापना प्रसंगी भक्तीच तल्लीन होणार आहे याप्रसंगी कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्रभारी यांना योग्य त्या सुचना देऊन सर्वांना दक्ष राहुन आपआपले परीसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांनी आपले उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील त्यांचे अधिनस्त असलेले पथकास योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन दारुबंदी संबंधी कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानुसार दिनांक २२/१/२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास पथक हे वर्धा शहर परीसरात पेट्रेोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनिय माहीती मिळाली की सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत वरुड येथील एक ईसम एका चारचाकी वाहनाने दारुचा साठा घेऊन येणार आहे मिळालेल्या माहीतीनुसार सदरची माहीती वरीष्ठांना देऊन पोलिस हवालदार अमर लाखे ,पोशि पवन निलेकर,मंगेश चावरे,समीर शेख ,यांनी पोलिस स्टेशन.सेवाग्राम हद्दीत आज दिनांक २२/१/२४ रोजी मध्यरात्री ०२.०० वा चे सुमारास मिळालेल्या माहीतीनुसार एक चारचाकी वाहन हुंडाई कंपनीचे सोनाटा क्र. MH-02 JP6921 ह्याला थांबवुन त्याची तपासनी केली असता त्यात
१) रॅायल स्टॅग(RS) कंपनीच्या १८० ML च्या विदेशी दारूने भरून २ खर्ड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण ९६ बाटल्या प्रति नग ४००/-रू प्रमाणे एकुण ३८,४००/-रू.
२)ॲाफीसर चॅाईस कंपनीच्या १८० ml च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ४ खर्ड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण १९२ बाटल्या प्रति नग /-रू प्रमाणे एकुण ५७८००/-रू.,
३)ॲाफीसर चॅाईस ब्ल्यु कंपनीच्या १८० ml च्या विदेशी दारु भरुन असलेल्या १ खर्ड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण ४८ बाटल्या प्रति नग ३५०/-रू प्रमाणे एकुण १६,८००/-रू.,
४) टुबर्ग कंपनीच्या ५००ml .च्या बियर दारूने भरून असलेल्या १ खर्ड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण २५ टिन कॅन प्रति नग ३००/-रू प्रमाणे एकुण ७२००/-रू, मिळुन असा १.२००००/- दारुसाठा मिळुन आला वरुन त्या गाडीचा चालक व त्याचे सहकारी
१) सुधीर चंद्रभान सहारे वय ५४ वर्ष रा. वार्ड नं. ४ समता नगर, वरूड सेवाग्राम जि.वर्धा
२) मयुर प्रकाश मंद्रीले वय २४वर्ष रा. स्नेहल नगर, सेवाग्राम रोड, वर्धा
३) प्रफुल शंकरराव बांगडकर वय ३० वर्ष रा. सावजी नगर, झोपडपटटी,वर्धा
यांना ताब्यात घेऊन त्यांनी हा माल हिरा कोहचडे यांचेकडुन घेतल्याचे सांगितले
४) हिरा कोहचडे रा. कळंब (ताब्यात नाही)
म्हनुन या चारही आरोपी विरोधात पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अप. क्रं. – 00३५/२०२४ कलम ६५ अ ई ७७अ ८३ मदाका सहकलंम ३(१) १८,१३०,१७७ मो वा का नुसार गुन्हा नोंद केला असुन त्यांच्या ताब्यातुन वर नमुद दारुसाठा व
४) एक नोकीया कपंनीचा साधा मोबाईल त्या मध्ये जिओ कपंनीचे सिम क्र 7083095725 की. १०००/-/- रू
५) एक नोकीया कपंनीचा साधा मोबाईल त्या मध्ये जिओ कपंनीचे सिम क्र 9960092865 की. १०००/- रू
६)जुनी वापरती एक चारचाकी हुंडाई कंपनीची सोनाटा क्र MH 02 जे.पी. 6921 गोल्डन सिल्वर रंगाची किंमत अंदाजे ७,00,000/- रू
असा एकुण ८,२२०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरीता पोलिस स्टेशन सेवाग्राम यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील कार्यवाही पोलिस स्टेशन सेवाग्राम करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमर लाखे,पोलिस शिपाई पवन निलेकर,मंगेश चावरे,समीर शेख यांनी केली