वर्ध्यातील पुलगाव शहरात एकाच रात्री घडल्या ५ घरफोडी
पुलगाव,- सवीस्तर व्रुत्त असे की मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाच दुकानांचे शटर फोडून 2 लाखाच्या चांदीसह लाखो रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला काळ्या रंगाचे मास्क चोरट्यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ज्वेलर्समधूनसचोरट्यांनी 2 लाखाचे चांदीचे दागिने चोरून नेले. कृषी केंद्रात फक्त हजार-बाराशे
रुपयेच त्यांच्या हाती लागले. नाचणगाव बायपास जवळ असलेल्या अन्नदाता कृषी केंद्र तसेच एचपी गॅस एजन्सी व व्ही टेक इंजीनियरिंग दुकानाचे शटर चोरट्यांनी फोडले गल्ल्यात असलेले पैसे लंपास केले. येथून जवळच असलेल्या रामदेव बाबा टाइल्स
दुकानांमध्ये फक्त कुलूप तोडून चोरटे पसार झाले. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सोनाराच्या दुकानात व मुख्य रस्त्या लगत असलेल्या दुकानात धाडसी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनी भेट दिली. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.