
स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….
सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल…..
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात आहे. उघडकीस न आलेल्या गुन्हयांना उघडकीस आणण्यावर भर देवुन स्थानिक गुन्हे शाखेला तशा सुचना वजा आदेश देण्यात आले होते


त्याअनुषंगाने जिल्ह्यात मोटार सायकल चोरी व त्याची अवैध विक्री करणारा अट्टल दुचाकी चोरटा सराईत गुन्हेगार योगेश अशोक गिरी, वय २४ वर्ष, रा. लाखाळा वाशिम याने त्याचा साथीदार विष्णुदास चंद्रकांत झाटे, वय २५ वर्ष, रा.पिंपळगांव ता. मंगरुळपीर यांनी वाशिम व इतर ठिकाणा वरुन मोटर सायकल चोरी केल्याचे निष्पन्न करुन व त्याची खात्री पटल्याने सदर दोन्ही इसमांना सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी एकुण ०७ मोटार सायकली चोरी केल्या बाबत सांगीतले.

त्यांनी सांगीतल्याप्रमाणे सदर ठिकाणी जावुन एकुण ०७ मोटार सायकली ताब्यात घेतल्या. सदर मोटर सायकलचे चेसीस कमांक व इंजीन क्रमांकावरुन पडताळणी केली असता मोटर सायकल कमांक MH 37 F 6039 पो.स्टे वाशिम शहर अप. कं ६९/२०२४ क.३७९ भादंवि व MH 37 D 5244 पो.स्टे वाशिम शहर अप.कं २७०/२०२४ क. ३७९ भादंवि मधील चोरी गेलेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.यावरुन दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन वाशिम शहर यांचे ताब्यात देण्यात आले

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक लता फड,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी वाशिम नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी, सपोनि जगदिश बांगर, सपोनि. योगेश धोत्रे, पोलिस अंमलदार विनोद सुर्वे, गजानन अवगळे, प्रविण सिरसाट, प्रशांत बक्षी महेश वानखेडे, संदीप दुतोंडे, अमोल इरतकर, अविनाश वाढे, गोपाल चौधरी, विजय नागरे, दिपक घुगे, संतोष वाघ, सुनील तायडे सर्व स्थागुशा वाशिम यांनी केली


