अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४)ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे
अशा माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून सदरची गोपनीय माहीती पोलिस निरीक्षक स्थागुशा रामक्रुष्ण महल्ले यांना देऊन त्यांच्या सुचनेप्रमाणे मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा, आयुष होटेल समोर १२:३० वा. जावुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या पथकाने संशयीत इसम हा पोलीस आल्याची चाहुल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानां त्याच्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व दोन राउंड जप्त करण्यात आले
त्यास त्याचे नाव विचारले असता त्यांने त्याचे नाव शेख सलमान उर्फ लाला शेख हुसेन वय २१ वर्ष रा. शेर का दर्गा वाशिम असे सांगितले त्याचे अंगझडतीत मिळालेल्या शस्त्रावरुन त्याचेविरुध्द भारतीय हत्यार कायदा १९५९ नुसार पोलिस स्टेशन वाशिम ग्रामिण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुज तारे. अपर पोलिस अधिक्षक भारत तांगडे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश धोत्रे पोहवा प्रशांत राजगुरू नापोशि ज्ञानदेव मात्रे पोशि विठ्ठल महले, दिपक घुगे, अमोल इरतकर स्थागुशा यांच्या पथकाने पार पाडली. अशा
प्रकारच्या संशयापद हालचाली लक्ष्यात आल्यास नागरिकानी पोलिस प्रशासनास कळवावे असे अहवान पोलिस अधिक्षक वाशिम अनुज तारे यांनी केले आहे.