
सराईत मोटारसायकल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या गळाला,११ मोटारसायकल केल्या हस्तगत…
मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेवुन चोरीच्या १० मोटर सायकल किंमत ६,५००००/- रू चा मुददेमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,.पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, चोरी, दरोडा करणाऱ्या इसमांवर दरारा व वचक निर्माण होण्यासाठी विविध उपाय योजना अवलंबुन जास्तीत जास्त आरोपी शोध मोहीम राबवुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले.त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे सपोनि जगदीश बांगर व स्थानिक गुन्हे शाखेची टिम यांनी पोलिस स्टेशन, रिसोड अप.क. ७३९/२३ कलम ३७९ भादंवि चे गुन्हया संदर्भाने तपासात गोपनिय गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे दोन आरोपी


१) विक्की केशव साबळे वय २३ वर्ष रा. धोडप बु

२)राजदिप कांबळे रा. रिसोड

यांना निष्पन्न करून आरोपी विक्की केशव साबळे वय २३ वर्ष याला
धोडप बु येथुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन मोटर सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार राजदिप कांबळे याचेसह मिळुन रिसोड शहरातील व परिसरातील ११ मोटर सायकल चोरी केल्याबाबत ची कबुली दिली. आरोपी विक्की केशव साबळे वय २३ वर्ष रा.धोडप बु याचे ताब्यातुन खालील वर्णनाच्या मोटरसायकल गुन्हयात जप्त करण्यात आल्या आहेत.
१) हिरो एच डिलक्स इंजिन नं. HA11EJG9B31664, चेचीस नं.MBLHA11ATG9B02865,
२). हिरो स्प्लेडर इंजिन नं. HAIIEYL5G62359, चेचीस नं. MBLHAW128LHG12654
3) होन्डा शाईन इंजिन नं. JC36E-7-3837345 चेचीस नं. ME4JC36NME7190374,
4) HERO DEO इंजिन नं.KWPGHMS105A 5. हिरोस्पेंलंडर इंजिन नं. HAJ0ELDHF48153 चेचीस नं. MBLHA 10ASDHF89911
6.)हिरो पॅशन प्रो इंजिन नं.HIWENCHE19135 चेचीस नं.
MBLHA10AWCHF17479,
7) हिरो होंडा रपेलडर इंजिन नं. 05J15M17984 चेचीस नं. 05J16C10796,
8) होंडा शाईन इंजिन नं. JC36E-7-3171531 चेचीस नं. ME4JC36JMD7717911,
9)स्पेंडरब्लॉकवाईट इंजिन नं. 05K15M14786 चेचीस नं.
05K16C42311,
10) स्पेंडरब्लुब्लॅक इंजिन नं.05316C10796 इंजिन नं. 05J15M17984 अशा वरील प्रमाणे मोटर सायकल किंमत ६५००००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
यापुर्वीही पोलिस स्टेशन मंगरूळपीर यांचे डि.बी पथकानी चोरीच्या गुन्हयातील ११ मोटर सायकल किंमत ६,२२,०००/- रू चा माल जप्त केल्या असुन अशा प्रकारे वाशिम जिल्हा पोलिस दलाकडुन एकुण २१ मोटर सायकल किंमत ७,१२,०००/- रू चा मुददेमाल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधिक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश बांगर, पोहवा गजानन झगरे, गजानन अवगळे, प्रविण शिरसाट, पोना गजानन गोटे, प्रविण राउत, पोका शुभम चौधरी, बाळु कंकाळ, मपोना संगिता शिंदे यांनी केली


