
धारदार शस्त्रांची अवैधपणे विक्री करणाऱ्या पंजाब येथील ईसमास वाशिम पोलिसांनी केली अटक,मोठ्या प्रमाणात शस्र्साठा केला जप्त…
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना घातक धारदार शस्त्र तलवार, खंजीर, गुप्ती व किरपान बाळगत सदर प्राणघातक शस्त्रांची अवैधपणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पो.स्टे. वाशिम शहर तपास पथकाने पंजाब येथील एका आरोपीस वाशिम शहरातून ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ४, ५, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई केली आहे. दि.२९.१०.२०२३ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथील तपास पथक पो.स्टे. हद्दीमध्ये गस्त करत असतांना प्राप्त गोपनीय माहितीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौककडून पाटणी चौकाकडे जाणाऱ्या रोडवर गुरुद्वाराजवळ एक इसम राखाडी रंगाच्या प्लास्टिक पोत्यामधून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्राणघातक शस्त्रे बाळगून त्यांची विक्री करतांना आढळून आल्याने त्यावर पंचासमक्ष शस्त्र अधिनियम रेड करून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव
बलदेवसिंग गुरुबचनसिंग, वय ४० वर्षे, रा. ग्राम बाडीकमबाके, तहसील पट्टी, जि. तरणतारण, राज्य पंजाब
असे सांगितले. पंचासमक्ष सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे एका राखाडी रंगाच्या प्लास्टिक पोत्यामधून एक ३५ इंच लांबीची लोखंडी धारदार तलवार, १३ लोखंडी किरपान, ०६ स्टीलच्या गुप्त्या, १० लोखंडी खंजीर असा एकूण ९००० रु. किंमतीचे प्राणघातक शस्त्रे मिळून आल्याने व त्या शस्त्रांचा परवाना त्याचेकडे नसल्याने सदर इसमाविरुद्ध पो.स्टे. वाशिम शहर येथे अप.क्र.८०२/२३, कलम ४, ५, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.गजानन धंदर, पोउपनि सचिन गोखले, पोहवा. लालमणी श्रीवास्तव, पोकॉ. महादेव भिमटे, उमेश चव्हाण यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चव सिंह (IPS) यांनी केले आहे.




