
दरोडा टाकणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद अनेक गुन्हे केले उघड..
यवतमाळ- सविस्त व्रुत्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी फिर्यादी सौ. छाया सुरेश महल्ले वय 39 वर्षे रा. ईद्रठाना ता. नेर यांनी पोलिस स्टेशन नेर येथे फिर्याद दिली की फिर्यादी व तिचे पती हे दोघे ईद्रठाना ते दहीफळ रोडवरील त्यांचे शेता समोर उभे
असतांना एकुण 06 ईसम हे दोन दुचाकी वर येवुन त्यापैकी MH 29 BG 1041 स्प्लेंडर प्लस या दुचाकीवर स्वार ०३ ईसमांनी तोंड दाबुन व गळ्याला चाकु लावुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची पोत व नाकातील बेसर असा एकुण 20.350/- रुपयाचे सोन्याचे दागीने जबरीने तोडुन हिसकावुन चोरुन दोन्ही मोटर सायकल वर स्वार 06 ईसम हे पळुन गेले. अशा फिर्यादी वरुन पो.स्टे. नेर येथे अपराध क्रमांक 746/2023 कलम 395 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करुन
तपासावर घेतला.
सदर गुन्ह्याची पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दखल घेवुन पोलिस स्टेशन नेर व , स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे पथक नेमुन पथकास गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. वरुन गुन्ह्यातील अनोळखी सहा आरोपिंचा शोध व तपासकामी पोलिस स्टेशन नेर व स्था.गु.शा. पथक हे पोलिस स्टेशन आर्णी पोलिस स्टेशन दारव्हा हद्दीत रवाना झाले असता सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीनी वापरलेले दुचाकी मोटार सायकल
MH 29 BG 1041 स्प्लेंडर प्लस हिचे मालकी हक्का बाबतचा शोध घेतला असता सदर मोटर सायकल ही आरोपी
01)सचिन दिलीप राठोड वय 23 वर्ष रा. अंतरगाव ता. आर्णी याच्या ताब्यात असल्याचे समजले वरुन सचिन दिलीप राठोड यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सचिन राठोड याने ग्राम दहिफळ- ते ईंद्रठाणा मध्ये असणार्या रोड वरील एका महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र व दागिने त्याचे अन्य पाच सहकारी यांचे साहायाने दोन मोटार सायकल चा वापर करुन चाकुचा धाक दाखवुन लुटल्याचे कबुली दिल्याने व त्याचे सोबत सदर गुन्ह्यामध्ये असणारे अन्य आरोपी नामे


2) बंजरंग बाबाराव जाधव वय 19 वर्षे रा. साजेगाव, 3) सुदर्शन दत्तराम चव्हान वय 22 वर्षे रा. धनगरवाडी

, 4) कुणाल राजेश्वर पाटील वय 21 वर्षे रा. शेलोडी, 5) सावंत सुधाकर परसोडे वय 22 वर्षे रा. साजेगाव,

6) सागर रामराव मात्रे रा. साजेगाव ता. दारव्हा हे सोबत असल्याचे कबुल दिल्याने वरील सर्व आरोपींना
ताब्यात घेवुन त्यांना ईतर कोणकोणते गुन्हे केले असल्याचे सखोल विचारपुस केली असता आरोपीतांनी सदर गुन्ह्याव्यतीरीक्त चाकुचा धाक दाखवुन ग्राम शिवनी, ग्राम अंजनखेड ग्राम पाभळ तालका आर्णी येथील रस्त्यावरील मजुर महीलांचे सोन्याचे दागीने जबरीने चोरल्याचे कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील जबरी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु आहे. आरोपीतांनी मिळुन केलेले सदर गुन्हे पोलिस स्टेशन येथे नोंद असुन खालील प्रमाणे…..
1) पो.स्टे. आर्णी जि. यवतमाळ अपराध क्रमांक 542/2023 कलम 392, 34 भा.द.वि.
2) पो.स्टे. आर्णी जि. यवतमाळ अपराध क्रमांक 562/2023 कलम 392, 34 भा.द.वि.
3) पो.स्टे. आर्णी जि. यवतमाळ अपराध क्रमांक 536/2023 कलम 392, 34 भा.द.वि.
सदरची कारवाई डॉ. पवन बन्सोड पोलिस अधीक्षक पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक,आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा, यांचे मार्गदर्शनात आधारसिंगसोनोने पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, केशव ठाकरे पो.नी. आर्णी, स.पो.नि. बाळासाहेब नाईक ठाणेदार नेर, स.पो.नि. गणेश वनारे स्था.गु. शा. यवतमाळ, पो.उप.नि. किशोर खंडार, पो.उप.नि. गणेश हिरुळकर, पो.उप.नि. दिपक बदरके, पो.उप.नि. गजानन अजमिरे यांचे पथकातील अंमलदार स. फो. राजेश चौधरी, नरेद्र लावरे, मनोहर पवार, सै. अनिस, पो.हवा. बबलु चव्हाण, सतिश चौधार, विजय चव्हाण, पो.ना. किशोर झेंडेकर, योगेश सलामे पो.कॉ. अमित झेंडेकर, अमित कुमरे, पवन ढवळे, राजेद्र सरदारकर, सचीन ठाकरे यांनी यशस्वीरित्या पार आहे.


