सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील  अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र
जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन बनसोड,पोलिस अधिक्षक  यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलिस स्टेशन चे ठाणेदार  ज्ञानोबा देवकते यांना गुन्हे उघडकीस करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक .ज्ञानोबा देवकते यांनी गुन्हयांचा तांत्रीक दृष्टया तपास करणेबाबत पोलिस स्टेशन स्तरावर त्यांचे अधिनस्त असलेले सपोनि प्रताप दत्तात्रय भोस, पोहवा, बलराम शुक्ला, नापोशि रूपेश ढोबळे, पोशि सागर चिरडे, कमलेश भोयर,प्रतिक नेवरे, यांचे पथक नेमन्यात आले. नेमन्यात आलेल्या पथकाने यापुर्वी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा मागोवा घेवून तांत्रीक तपास केला. तांत्रीक तपास करून आर.टी.ओ. कार्यालय परिसरात संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना, पोलिस अंमलदार कमलेश भोयर यांना सोनसाखळी चोरी करणारे आरोपी आणि वाहन यांचेशी मिळते जुळते वर्णन असलेले संशयीत इसम





१)नाजीम खॉन असलम खॉन, वय २१ वर्ष, रा.मोहसीम ले-आउट डोर्ली रोड, यवतमाळ



२) शेख फैजान शेख अनवर, वय २३ वर्ष, रा. आदर्श नगर, भोसा रोड, यवतमाळ.



हे आर.टी.ओ. परिसरात फिरत असतांना दिसुन आले. त्यावरून सपोनि प्रताप दत्तात्रय भोस, पोहवा बलराम शुक्ला, नापोशि रूपेश ढोबळे, पोशि सागर चिरडे, कमलेश भोयर, प्रतिक नेवरे यांनी वेशांतर करून आर.टी.ओ कार्यालय चौकात सापळो रचुन
संशयीतांना गुन्हयात वापरण्यात आलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयीत आरोपींनी विचारपुस दरम्यान उडव.उडविची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीतांनी अवधुतवाडी पोलिस स्टेशन मधील ३ गुन्हे एकुण मुद्देमाल २१ ग्रॅम ३४० एम.एल. चा मुद्देमाल अंदाजे किंमत १,०६०००/- रू व आरोपींनी गुन्हयात वापरलेली मोटर सायकल कि.अं. ५०,०००/- रू., दोन मोबाईल किं. २२,०००/- रू. असा एकुण १,७८,०००/- रू. चा मुद्देमाल आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपींनी यवतमाळ शहर आणि लोहारा पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये सुध्दा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाची कामगिरी डॉ. पवन बनसोड, पोलिस अधिक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलिस अधिक्षक संजय पुजलवार, उपविभागीय पोलिस अधिक्षक यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, ज्ञानोबा देवकते, पो.स्टे. अवधुतवाडी व सपोनि रामकृष्ण भाकडे, धैर्यशील घाडगे, प्रताप दत्तात्रय भोस, पोहवा/गजानन दुधकोहळे, बलराम शुक्ला, घनशाम मेसरे, आशिष भुसारी, नापोशि रूपेश ढोबळे, गोवर्धन वाढई, पोशि सांगर चिरडे, कमलेश  भोयर, प्रतिक नेवरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!