
पैशाचा अपहार करुन फरार झालेल्या आरोपीस नांदेड येथुन घेतले ताब्यात….
अपहार करुन फरार झालेला आरोपी 1500 किलोमिटर पाठलाग करुन नांदेड जिल्हातुन ताब्यात घेवून गुन्हयातील अपहार केलेली रोख रक्कम एकुण 10,02,250 /- रुपये केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सायबर सेल यवतमाळ यांची संयुक्तीक कारवाई..,,
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच प्रलंबित गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता.पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून वरील गुन्हयातील पाहीजे व फरार आरोपी शोध घेण्याच्या सुचना देवून आदेशित केले होते.


त्यानुसार पोलिस स्टेशन उमरखेड अप क्रमांक 178/2024 कलम 408, 409 भादवि मधील फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे यास भारत फायनस कंपनीची रक्कम 10,03,274 /-रु बँकेत जमा करण्याकरीता दिली असता आरोपी यांनी सदरची रक्कम स्वतःचे फायदया करीता घेवून अपहार करुन
दि.14/03/2024 रोजी पळून गेला अशा तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील आरोपीचा
उमरखेड, पुणे, सोलापूर, लातुर, नांदेड, निजामाबाद, हैद्राबाद, या भागात शोध घेतला परंतू आरोपी हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने कोणताही सुगावा लागत नव्हता. सदर आरोपी यास अटक करण्याकरीता,सायबर सेल यवतमाळ यांची मदत घेवून त्याचेसह तपास करण्याबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या.
दिनांक 25/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेल यवतमाळ हे सदर गुन्हयातील आरोपी यांचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे 1500 किलो मिटर पाठलाग करुन अतिशय जिद्दीने व चिकाटीने पोलिस कौशल्याचा वापर करुन शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत व तांत्रीक दृष्टया प्राप्त माहीती वरुन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्याकरीता नांदेड येथील कलामंदीर परिसरात येत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद अधिकारी व
अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोध कामी नांदेड येथे रवाना होवून आरोपीचा शोध घेवुन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे वय
25 वर्षे, रा. चिरली ता. बिलोली जि. नांदेड हा कलामंदीर नांदेड येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता
त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचा समक्ष त्याची व त्याचे सोबत असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याचे कडून
अपहार केलेली रोख रक्कम व मुददेमाल असा एकूण 10,02,250 /- मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुढील कारवाई
करीता उमरखेड पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई वरिष्टांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अधारसिंग सोनुने, स्थागुशा यवतमाळ, पोनि अरुण परदेशी, सायबर
सेल, सपोनि, गजानन गजभारे, स्थागुशा यवतमाळ, सपोनि अमोल पुरी सायबर सेल, पोउपनिरी शरद लोहकरे, चापोउपनिरी रविंद्र
श्रीरामे,रेवन जागृत पोहवा तेजाब रंणखांब,सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार,रमेश राठोड,पोशि मोहम्मद ताज, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, मपोहवा अर्पीता चौधरी, नापोशि प्रविण कुथे, पोशि अजय निंबोळकर, अभिनव बोन्द्रे, अविनाश शहारे, सचिन देवकर, मपोशि प्रगती कांबळे, मपोशि पुजा भारस्कर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



