
तहसील कार्यालय परीसरातुन ट्रकची चोरी करणाऱ्या आरोपींना वर्धा जिल्ह्यातून गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेने मारेगांव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन 01 ट्रक व 01 स्विफ्ट डिझायर वाहन असा एकुण 5,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तहसिल कार्यालय मारेगांव येथील प्रांगणात उभा करुन ठेवलेला ट्रक क्रमांक एम. एच. 36- 1675 हा अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती तसेच सदर प्रकरणात यातील फिर्यादी अव्वल कारकुन दिनेश पांडे यांनी पोलिस स्टेशन मारेगांव येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द अपराध क्रमांक 211/2024 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


तेंव्हापासुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणन्याचे प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेकडुन सातत्याने सुरु होते.

त्याअनुषंगाने दिनांक 31/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंदयाविरुध्द
कार्यवाही करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की सदर गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रक हा लपवुन ठेवला आहे ट्रक बाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने वर्धा जिल्हयातील ग्राम सालोड व ग्राम पालोती येथुन आरोपींचा शोध घेवुन आरोपी 1) शेख अफरोज शेख अब्दुल वय 32 वर्षे, रा. सालोड जि. वर्धा, 2) शेख रोशन शेख अब्दुल वय 35 वर्षे रा. पालोती जि. वर्धा, 3) प्रणय धनराज पोहाणे वय 24 वर्षे, रा. पालोती जि. वर्धा व 4) पवन देवरावजी किनाके वय 23 वर्षे, रा. सालोड जि. वर्धा यांना ताब्यात घेवुन त्यांनी ग्राम आंजी अंदोरी नदी परिसरात लपवुन ठेवलेला ट्रक एम. एच. 36- 1675 कि. अ. 2,50,000/- रु चा हस्तगत केला.

तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेली स्विफ्ट डिझायर हे चारचाकी वाहन कि. 3,00,000/- रु असा एकुण 5,50,000/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी 1) शेख अफरोज शेख अब्दुल वय 32 वर्षे, रा. सालोड जि. वर्धा, 2) शेख रोशन शेख अब्दुल वय 35 वर्षे रा.
पालोती जि. वर्धा, 3) प्रनय धनराज पोहणे वय 24 वर्षे, रा. पालोती जि. वर्धा व 4) पवन देवरावजी किनाके वय 23 वर्षे, रा. सालोड जि. वर्धा यांना पुढील कारवाई कामी पोलिस स्टेशन मारेगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागिय पोलिस अधिकारी,वणी गणेश किंद्रे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते, स्थानिक गुन्हे
शाखा यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


