सावकाराचे अपहरण करुन खंडणी मागणारे काही तासात गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव येथील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करुन दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच केला उघड,एकुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक…..

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२२) रोजी राळेगांव येथे राहणारे फिर्यादी सधी सत्यनारायण रेड्डी वय ४२ वर्षे हे वसुली करुन घरी जात असतांना हरेकृष्ण मंगल कार्यालयाजवळ ०६ अज्ञात इसमांनी त्याची अडवणुक करुन चाकुचा धाक दाखवुन त्यास त्याचे मोटारसायकल सह अपहरण केले व त्यांचेकडील १,२५,०००/-  रु. जबरीने हिसकावून घेतले होते





त्यांनतर सुध्दा त्यांना वेगवेगळया मोबाईल फोन वरुन जिवे मारण्याच्या व परीवारास त्रास देण्याच्या धमक्या देवुन ५,०००००/- रु खंडणी ची मागणी करुन १५,८०००/- रु ऑनलाईन ट्रान्सफर करावयास लावले होते त्या वरुन दिनांक २७/०६/२०२४ रोजी पो.स्टे. राळेगांव येथे त्यांचे तक्रारी वरुन अप.क्र. २४१ / २०२४ क.३६४ (अ).३९५.३८७ भादव चा गुन्हा नोंदविण्यात आला होता



गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास स्था. गु.शा. येथील पथकांना करण्याच्या सुचना दिल्या होत्या .त्या वरुन स्था.गु.शा कडील पथकाने तांत्रिक बाबींचे अवलोकन करुन गोपनीय माहीतगारांच्या मार्फतीने गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला होता अश्यातच मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार ३ आरोपी खंडणीची रक्कम फिर्यादी कडुन घेण्याकरीता राळेगांव येथे फिरत असल्याचे समजल्याने स्था.गु.शा. पथकाने सापळा रचुन खंडणीचे
रक्कम घेण्या करीता आलेले आरोपीत  १) तेजस संतोष भेंडारकर वय २१ वर्षे रा. सिंघानिया नगर यवतमाळ २) पृथ्वी देवीदास पवार वय २३ वर्षे रा. वाघापुर यवतमाळ व ३) एका विधी सं.बालकास जागीच ताब्यात घेवुन त्याचे कडुन अधिक विचारपुस करुन गुन्हयातील उर्वरीत आरोपीची नावे निष्पन्न केली व पळुन जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य सुत्रधार ४) सौरभ उर्फ हेकडी राजेंन्द्र पंडागळे वय २० वर्षे रा. सिंघानियानगर यवतमाळ ५) प्रणव रविंद्र शिंदे वय २१ वर्षे रा. इंदिरानगर लोहारा यांना धामणगांव रेल्वे स्टेशन येथुन तसेच ६) सुरज विलासराव कुरकुडे वय २७ वर्षे व ७)
अभिजित शंकरराव शिवणकर वय २२ वर्षे दोन्ही रा. राळेगांव यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पो.स्टे. राळेगांव यांचे स्वाधीन केले असुन गुन्हयाचा पुढील कारवाई करोता पोलिस ठाणे राळेगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध खुन खुनाचा प्रयत्न, मकोका, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.



सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात स्था. गु.शा. यवतमाळ येथील अधिकारी सपोनि गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, पोउपनि धनराज हाके, रामेश्वर कांडुरे व अंमलदार यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!