
विक्रीसाठी गांजा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
गांजा सद्रुश्य अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगणार्यास पुसद ग्रामीण हद्दीतुन स्थानिक गुन्हे शाखेने ४ किलो गांजासह घेतले ताब्यात…..
पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
यवतमाळ जिल्हयात आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नये व जिल्हयात शांतता राहावी
यादृष्टीने जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी, सुगंधीत तंबाखु, गुटखा व अवैध रेती तस्करी या सारख्या अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.


त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाल
यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.त्यानुसार
दिनांक 07/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसद परिसरात असतांना पथकास मुखबीर कडुन खात्रीलायक
माहीती मिळाली कि, मौजे कान्हा येथील इसम नामे पंकज विष्णु कटारे हा गांजा नामक अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने बाळगुन
असुन तो विक्री करीता बाहेर घेवुन जाणार आहे अशा प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन पुसद
माहुर रोड वरील कान्हा फाटा, सापळा कारवाई करुन इसम नामे पंकज विष्णू कटारे वय 21 वर्षे, रा. कान्हा ता. महागांव यास ताब्या
घेवुन त्याचे ताब्यातुन 4 किलो गांजा व एक मोबाईल फोन असा एकुण किंमत 1,00,000/- रु चा मुददेमाल हस्तगत करुन जप्त
केला. वरुन आरोपी पंकज विष्णू कटारे वय 21 वर्षे, रा. कान्हा ता. महागांव याचे विरुध्द NDPS Act अन्वये पोलिस स्टेशन पुसद
ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री पवन बन्सोड, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री पियु
जगताप, मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनात, श्री आधारसिं
सोनोने पो.नि. स्था.गु.शा., श्री. गोपाळ उंबरकर पो.नि. पो.स्टे. पुसद ग्रामीण, सपोनि गजानन गजभारे, पोउपनि / शरद लोहकरे, चापोउप
रेवण जागृत, चापोउपनि/रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/ कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड
यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ अवैध धंदे, अवैध अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, संपत्ती विषयक गुन्हे उघड करणे तसेच अंमली पदार्थ तस्करी, अवैध जनावर तस्करी, अवैध रेती तस्करी व अशा स्वरुपाचे गैरकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करण्यास कटिबध्द असुन जनतेला आवाहन करण्यात येते की, आपले परिसरात सुरु असलेल्या अशा स्वरुपाचे अवैध धंदयासंबधीत माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलिसांना पुरावावी व पोलीसांना सहकार्य करावे.



