यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्याचा साठा…
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला 68,37,600/- रु चा मुद्देमाल जप्त…..
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात लपुन चोरुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतुक साठवणुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून जिल्हयात गुटखा सुगंधीत तंबाखुची वाहतुक विक्री साठवणुक होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरुनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सातत्याने करीत होते.
त्याअनुषंगाने दिनांक 06/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला खात्रीशीर खबर मिळाली की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एक आयशर वाहन दारव्हा रोडने यवतमाळ कडे येणार आहे, अशा माहीतीवरुन पथकाने वरिष्ठांना सदर बाबतीत माहीती देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) यवतमाळ यांना मिळालेल्या माहिती बाबत सुचना देवून कायदेशीर कारवाई करण्याकरीता पाचारण केले त्यावरुन पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करुन छापा कारवाई करण्याकरीता यवतमाळ दारव्हा रोडवरील घाटात चिद्दरवार कंस्ट्रक्शन समोर सापळा लावून थांबले असतांना माहिती प्रमाणे संशयीत आयशर वाहन क्रमांक एम.एच. 40 एके 7045 हे येतांना दिसल्याने त्यास पोलिस पथकाचे मदतीने थांबवून सोबत असलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांचे व पंचासमक्ष सदर वाहनातील चालक यास नांव गांव विचारले असता त्याने आपले नांव तोरन सुखराम गहाणे वय 25 वर्षे, रा. वार्ड क्र. 3 मु. उचापुर, पोस्ट काकोडी ता. देवरी जि. गोंदीया असे असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष त्याचे वाहनाची झडती घेतली असता वाहनात 1) सुगंधीत तंबाखु (मजा 108) 50 ग्राम वजनाचे चे 2000 डबे, 2) सुगंधीत तंबाखु (मजा 108) 200 ग्राम वजनाचे चे 2800 डबे, 3) सुगंधीत तंबाखु (इगल 108) 40 ग्राम वजनाचे पाउच असलेले 06 पोते, 4) सुगंधीत तंबाखु (इगल 108) 200 ग्राम वजनाचे 1600 मोठे पॅकेट, 5) सुगंधीत तंबाखु (विनालेबल सिल्वर कोटींग) 3 किलो ग्राम वजनाचे 500 पॅकेट असा एकूण 52.37,600/- रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व आयशर वाहन क्रमाक एम.एच. 40 एके 7045 असा एकूण 68,37,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांचे फिर्यादी वरुन पोलिस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे अन्न सुरक्षा मानके व भा.द.वि कावदयाचे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी तोरन सुखराम गहाणे वय 25 वर्षे, रा. वार्ड क्र. 3 मु. उचापुर, पोस्ट काकोडी ता.देवरी जि. गोंदीया व जात मुद्देमाल पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात,पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्वागुशा, सहा. पोलिस निरीक्षक, अमोल मुडे, पोउपनि राम कांडुरे, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.