राळेगाव पोलिसांनी अज्ञात खुन प्रकरणाचा केला उलगडा,महीलेचा प्रेमीच निघाला खुनी….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अनोळखी म्रुतकाची ओळख पटवून मारेकर्यास घेतले ताब्यात,प्रेमीच निघाला खुनी….

राळेगाव(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (१७) जुलै २०२४ रोजी दुपारी पोलिस स्टेशन राळेगांव येथे माहीती मिळाली की, वलीनगर शिवार मध्ये इ. क्लास चे जंगलामध्ये एक स्त्रि जातीचे प्रेत मृत अवस्थेत पडुन आहे अशा माहीती वरून पो.स्टॉप सह सदर ठिकाणी जावुन  प्रेताची पाहणी केली असता प्रेत स्त्री जातीचे वय ३५ वर्ष असे जीचे छातीवर पाठीवर हनवटीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे आढळुन आले.





सदर अनोळखी प्रेताची ओळख पटविण्याकरीता पोलिस स्टेशन ला  हरविले इसम रजिस्टर ची पाहणी केली असता अशा वर्णनाची महीला सौ. आरती शरद कोवे वय ३४ वर्ष जात प्रधान व्यवसाय मजुरी रा. पिंपरी दुर्ग ता. राळेगांव ही दि. १६.०८.२०२४ रोजी राळेगांव येथे बाजाराकरीता आली व परत घरी गेलीच नाही अशी नोंद आढळुन आल्याने सदर हरविलेल्या व्यक्तीचे नातेवाईकांना बोलावुन प्रेताची ओळख पटविली असता सदर महीला त्याची पत्नी सौ. आरती कोवे असल्याचे सांगितले. त्वरीत सदर प्रकरणी पो.स्टे. राळेगांव येथे अपराध क ३१२/२०२४ कलम ३१२/२०२४ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये  अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.



गुन्हयांचा तपासा दरम्यान त्वरीत अज्ञात मारेकरी आरोपी यांचा शोध सुरू करून गोपनिय बातमीदार याचे कडुन माहीती करून यातील मृतक हिचे प्रेम सबंध असलेला इसम दर्शन उर्फ गणेश दिलीपराव येपारी वय २१ वर्ष जात खैरी कुणबी रा. शांतीनगर राळेगांव यास राळेगांव येथुन ताब्यात घेउन त्याच गुन्हयांसबंधाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयांची कबुली दिली की, त्याचे यातील मृतक हिचे सोबत बरेच दिवसापासुन प्रेम सबंध होते. त्याच कारणावरून त्यांच्यामधे वाद होत होते. त्यातुनच आरोपी याने मृतक सौ आरती कोवे हिला दि. १६.०८. २०२४ रोजी दुपारी घटनास्थळी नेले व तेथे आरोपी हिचे मृतक याचे सोबत  वाद झाला आरोपी याने जवळ कमरेला सोबत नेलेला धारधार चाकुने मृतक हिचे छातीवर, पाठीवर, हनवटीवर वार करून तीचा खुन केला असल्याचे कबुली दिली. यावरुन सदर आरोपी यास गुन्हयांत अटक करण्यात आली असुन त्याची आज दि. १८.८.२०२४ रोजी वि.न्यायालय यवतमाळ येथे हजर केले असता वि.न्यायालयाने आरोपीस  ५ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयांत वाढीव कलम ३(२) (V) अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदान्वये कलमवाढ करण्यात आली.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलिस अधिक्षक  पियुश जगताप, याचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी,यवतमाळ रामेश्वर वैजने पोलिस स्टेशन. राळेगांव येथील पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, पोउपनि दिपक राणे, पोउपनि विशाल बोरकर, पोहवा गोपाल वास्टर, रत्नपाल मोहाडे, रवि सिंहे नापोशि. विशाल कोवे, सुरज चिव्हाणे, रूपेश जाधव, सुरज गावंडे, महेश नाईक, पोशि राजु शेंन्डे, योगेश वाघमोडे यांनी व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पो.नि. ज्ञानोबा देवकते, सपोनि अमोल मुडे, सपोनि वाढवे, पो.उप.नि. हाके व पोस्टॉप यांनी केली. पुढील तपास श्री रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा हे करीत

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!