रेकी करुन दिवसाढवळ्या सात घरफोडीचे गुन्हे करणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नेर शहरात एकाच दिवशी सात घरफोडी करणाऱ्या टोळीस,ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ४,८२,९७०/- रु चा  मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस ठाणे नेर व स्थानिक गुन्हे शाखा  यांची संयुक्त कारवाई…

नेर(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(१२)मे २०२४ रोजी नेर येथे सकाळी १० ते ०५ वाजताचे दरम्यान अज्ञात आरोपींच्या टोळींनी नेर शहरात रेकी करुन बंद असलेले सहा घर फोडुन लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता सदर प्रकरणी पोलिस ठाणे येथे प्राप्त तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुध्द घरफोडीचे गुन्हे नोंद करण्यात आले होते.





एकाच दिवशी सहा घरफोडीचे गुन्हे नोंद झाल्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलिस ठाणे नेर यांना सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणने करीता वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थागुशा व पोलिस ठाणे नेर कडील पथके अज्ञात आरोपींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत होती. पथकांनी गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने तांत्रीक बाबी व गोपणीय माहितीगार यांचे मार्फतीने मिळविलेल्या माहिती नुसार आरोपी १) संजय पंडीतराव नामनुर वय ३० २) सैय्यद हनिफ सैय्यद जफर वय २५ रा. महेबुब नगर, नुरी चौक नांदेड, यांना गुन्हयात निष्पन्न करुन त्यांना दिनांक ०७/०६/२०२४ रोजी नांदेड येथुन ताब्यात घेतले व नमुद दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी प्राप्त करुन स्थागुशा व पो.ठाणे नेर कडील पथकाने केलेल्या तपासात आरोपींनी गुन्हयांची कबुली देवुन नमुद आरोपी हे चोरीचा माल त्यांचा साथीदार ३) सैय्यद जाकीर सैय्यद जफर वय अंदाजे ३० रा. महेबुब नगर, नुरी चौक नांदेड, याचे मार्फतीने विक्री करीत
असल्याचे सांगीतले आहे.



आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागीने व त्यांनी गुन्हा करते वेळी वापरलेली ०१ मोटारसायकल ०२ मोबाईल असा एकुण ४,८२,९७०/- रु चा मुद्देमाल आतापर्यंत  केलेल्या तपासात हस्तगत केला असुन पोलिस ठाणे नेर यांचेकडुन फरार अरोपी सैय्यद जाकीर सैय्यद जफर याचा शोध व अधिक तपास सुरु आहे. नमुद दोन्ही आरोपी विरुध्द यवतमाळ जिल्हयातील पुसद तसेच बाहेर जिल्हयात नांदेड, परभणी, हिंगोली, येथे सुध्दा चोरी, घरफोडीचे बरेच गुन्हे नोंद असुन काही गुन्हयात ते पाहिजे असल्याची माहिती प्राप्त होत आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक,पियुष जगताप, सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा चिलुमुला रजनिकांत,
आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.स्टे. नेर बाळासाहेब  नाईक,सपोनि गणेश वनारे, स्था. गु.शा. यवतमाळ, पोउपनि किशोर खंदार पो.स्टे. नेर व पो.स्टे. नेर येथील पोलिस अंमलदार पवन चिरडे, यादवराव जाधव, उमर शेख, सचिन फुंडे, स्था.गु. शा. कडील पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, मिथुन जाधव,किशोर झेंडेकर, अमीत झेंडेकर, सोहेल मिर्झा, जितु चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!