महागाव दरोडा प्रकरणातील फरार आरोपीस यवतमाळ पोलिसांनी मुंबई येथुन घेतले ताब्यात….
महागांव हद्दीतील दरोडयाचे गुन्हयात फरार आरोपींना मुंबई येथुन घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे महागांव यांची संयुक्तिक कारवाई….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०८) जुन २०२४ रोजी रात्री दरम्यान पोलिस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम चिल्ली ईजारा गोकुळवाडी शेतशिवारात राहणारे संतोषकुमार मनोहर पांडे यांचे घरी अज्ञात सहा ते सात ईसमांनी संतोषकुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारहाण करुन दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ३३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. सदर प्रकरणी संतोषकुमार पांडे यांनी दिनांक ०९/०६/२०२४ रोजी पो.स्टे. महागांव येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञाताविरुध्द अपराध क्रमांक ३८८/२०२४ कलम ३९७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात
आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक डॅा पवन बनसोड यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आनण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडुन दिनांक २१/०६/२०२४ रोजी सदरचा गुन्हा उघडकीस
आणुन यातील ०२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांकडुन सुरु होता.
अशातच गुन्हयातील काही आरोपी हे मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पथकाला प्राप्त झाली होती त्यावरुन स्था.गु.शा.
पथक मुंबई येथे तळ ठोकुन आरोपींचा मागोवा घेत असतांना पथकास माहिती मिळाली की, यातील आरोपी १) चंदु लक्ष्मण राऊत वय ३० वर्षे, २) राजु भिमराव देवकर वय २८ वर्षे, दोन्ही रा. किनवट गंगानगर जि. नांदेड हे धोबीघाट उल्हासनगर येथे नातेवाईकांस भेटण्याकरीता येत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली त्यावरुन पथकाने अतिशय शिताफीने सदर परिसरात सापळा रचुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. नमुद आरोपी १) चंदु लक्ष्मण राऊत वय ३० वर्षे, २) राजु भिमराव देवकर वय २८ वर्षे, दोन्ही रा. किनवट गंगानगर जि. नांदेड यांना पुढील तपास कामी पोलिस स्टेशन महागांव यांचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागिय पोलिस अधिकारी,उमरखेड हनुमंतराव गायकवाड, पोलिस निरीक्षक स्थागुशा ज्ञानोबा देवकते, पोलिस निरीक्षक धनराज निळे ठाणेदार, पो.स्टे. महागांव यांचे मार्गदर्शनात पोउपनि शरद लोहकरे, पोलिस अंमलदार कुणाल मुंडोकार, रमेश राठोड स्था.गु.शा. यवतमाळ व पोलिस स्टेशन महागांव येथील पोउपनि सागर अन्नमवार, पोलिस अंमलदार संतोष जाधव, चालक अंमलदार शेख हबीब यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.