वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश पात्र परीक्षा (NEET)डमी उमेदवार बसवून पास करुन देणारी आंतराज्यीय टोळी लागली यवतमाळ पोलिसांच्या हाताला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०७/०५/२०२३ रोजी तक्रारदार कार्तिक सुभाष कन्हे वय २६ वर्षे व्यवसाय नौकरी (लिपीक पोदार इंटरनॅशनल स्कुल यवतमाळ) रा. गोधनी रोड यवतमाळ यांनी पोस्टे यवतमाळ शहर येथे येवुन फिर्याद दिली की, दिनाक ०७/०५/२०२३ रोजी त्यांचे शाळेवर एन.टी.ए. दिल्ली मार्फत NEET ची परीक्षा होणार असल्याने त्याकरीता एन.टी.ए. दिल्ली यांचे मार्फत पुरविण्यात आलेल्या बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन व चेहरा पडताळणी करणारे इनोवेटीव्ह प्रायवेट लिमिटेड चे प्रमुख पवन रमेश डोंगरे यांचे कडुन उमेदवारांची ओळख पटविण्यात आली व सदरची माहीती एन.टी.ए. दिल्ली यांना पाठविण्यात आली असतांना उमेदवार
१) आकार चंद्रकांत पाटील रा. कोपरी पालघर जि. पालघर,

२) एक विधीसंर्घग्रस्त बालक यांची फेरतपासणी करा असे कळविल्याने त्यांची पुन्हा तपासणी केली असता नमुद उमेदवार यांचे जागेवर





१) जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी वय २२ वर्षे रा. घुगल बिकानेर
पोस्टे नया शहर ठाणा बिकानेर, राजस्थान



२) महाविर सिखरचंद नाई रा. गयाशहर पाबु चौक बिकानेर, राजस्थान यांनी NEET ची परीक्षा दिल्याचे लक्षात आल्याने उपरोक्त नमुद इसमांनी बनावटी प्रवेश पत्र बनावटी आधारकार्ड तयार करुन ते वापरुन NEET ची परीक्षा देवुन आमची व शासनाची फसवणुक केली आहे. अशा तक्रारीवरून पोस्टे यवतमाळ शहर येथे अप क्रमांक ३८६/२०२३ कलम ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४७१,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांर्भीय व व्याप्ती पाहता  पोलिस अधीक्षक  यांनी तात्काळ गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
हस्तांतरीत केला. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेने कसोशिने तपास करुन NEET परीक्षेत बसलेले डमी उमेदवार नामे



१)
जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी वय २२ वर्षे रा. घुगल बिकानेर पोस्टे नया शहर ठाणा बिकानेर, राजस्थान

२) महाविर सिखरचंद नाई रा. गयाशहर पाबु चौक बिकानेर, राजस्थान यांना लगेच अटक करुन त्यांना गुन्हयाबाबत सविस्तर विचारपुस करुन त्यांचेकडुन गुन्हयात सहभागी इतर आरोपींता बाबत माहीती घेवून गुन्हयात सहभागी इतर आरोपी नामे

३) आकार चंद्रकांत पाटील रा. कोपरी पालघर जि. पालघर,

४) गजानन मधुकर मोरे वय ३६ वर्षे रा. नांदेड,

५) नागनाथ गोविंद दहीफळे वय ४२ वर्षे रा. नांदेड,

६) राजीव रामपदारथलाल कर्ण वय ४४ वर्षे रा. झारखंड,

७) नरेश बलदेवराम बिष्णोई वय २२ वर्षे रा. जोधपुर
( राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी क्रमांक १,२ व ७ हे दिल्ली येथे वैदयकीय
शिक्षणक्रमाचे विदयार्थी असुन आरोपी क्रमांक ४ व ५ हे नांदेड येथे NEET चे परीक्षेकरीता घेण्यात येणाऱ्या खाजगी शिकवणी
वर्गाशी संबधीत आहेत. यातील सहभागी गुन्हेगार हे वैदयकीय शिक्षणाकरीता घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षाकरीता जागोजागी
सुध्दा आरोपी डमी उमेदवार बसवुन आंतरराज्यीय रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाले असुन याच पध्दतीचा गुन्हा दिल्ली येथे
नामे नरेश बलदेवराम बिष्णोई याचेवर दाखल आहे. गुन्हयाचा तपास सुरु असुन गुन्हयातील इतर आरोपी यांचा शोध घेणे सुरु
आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक  पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा  आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, पोना सुधिर पिदुरकर, पोशि रजनीकांत मडावी,चापोना सतिश फुके सर्व स्थागुशा तसेच सायबर सेल यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!