अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने आर्णी येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आर्णी शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

आर्णी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,दिनांक १०/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की,अयाजुद्दीन काझी नावाचा ईसम हिंसकपणे आर्णी शहरात देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र) घेवुन फिरत आहे. अशा विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ आर्णी करीता रवाना होवुन आर्णी येथे पोहचुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता अधिक माहिती प्राप्त केली असता माहिती प्रमाणे संशईत हा आर्णी येथील नागपुर तुळजापुर रोडवर भरणाऱ्या बैल बाजाराजवळ उभा असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन पाहाणी केली असता माहिती प्रमाणे संशईत आढळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी वय २० वर्षे, रा. काळी दौ. ता महागांव असे सांगीतल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंगावरील जिन्सपॅन्टचे डाव्या बाजुला लावलेली असलेली एक देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र) मिळुन आली. पिस्टलची पाहाणी केली असता तिचे मॅग्जीन मध्ये ०२ जिवंत काडतुस आढळुन आले वरुन सदरची पिस्टल व काडतुस असा ५२,००० रु चा मुद्देमाल आरोपी अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी वय २० वर्षे, रा. काळी दौ. ता महागांव याचे कडुन जप्त करुन आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन आर्णी येथे भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करुन पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन आर्णी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुश जगताप, आधारसिंग सोनोने पो. नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गणेश वनारे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, प्रशांत हेडाऊ, विनोद राठोड, बबलु चव्हाण, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, आकाश सहारे चापोहवा योगेश टेकाम, जितेंद्र चौधरी सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!