मोटारसायकल चोरी करणारी आंतराज्यीय टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९ महागड्या मोटारसायकल सह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वसंतनगर पुसद हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम  हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल विक्री करणे करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे. अशा माहीतीवरुन पथकाने लगेच भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे जावुन खात्री केली असता खबरेप्रमाणे एक इसम विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल घेवुन उभा दिसला त्याचेजवळ जात असतांना त्यास पोलीस असल्याचा संशय आल्याने तो इसम पळ काढण्याचे तयारीत असतानांच त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

करन रमेश शिंदे वय २३ वर्षे रा. अंबा भवानी नगर ता. जि. परभणी





असे सांगीतले त्यास त्याचे ताब्यातील बुलेट मोटरसायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सदरची बुलेट मोटरसायकल ही शिवाजी शाळा वाशिम रोड पुसद येथुन चोरी केल्याचे सांगीतल्याने त्याबाबत खात्री केली असता बुलेट मोटरसायकल बाबत पोस्टे वसंतनगर पुसद येथे अप क्रमांक ३४७/२३ कलम ३७९ भादंवि चा गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने मागील दिड वर्षात पुसद, दिग्रस, खंडाळा, परभणी, व आदिलाबाद (तेलंगणा) येथुन त्याचा साथीदार



अनिल सोळंके वय २२ वर्षे रा. महागांव



याचे मदतीने मोटरसायकली चोरी करुन त्या

अवतारसिंग जंगुसिंग जुनी रा. जनकापुर ता. नागभिड जि. चंद्रपुर

यास विक्री केल्याचे सांगीतले वरुन आरोपी करन शिंदे याचेसह जनकापुर नागभिड येथे जावुन इसम  अवतारसिंग
जंगुसिंग जुनी यास ताब्यात घेवून त्याचेजवळुन चोरीच्या ०८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. अशा रितीने आरोपी

१) करन रमेश शिंदे वय २३ वर्षे रा. अंबा भवानी नगर ता. जि. परभणी,

२) अवतारसिंग जंगुसिंग जुनी वय ३५ वर्षे रा. जनकपुर ता. नागभिड जि. चंद्रपुर

यांचेजवळुन

रॉयल इनफिल्ड कंपनिच्या ०५ बुलेट,

०१ बजाज पल्सर,

०१ बजाज प्लॅटिना,

०१ हिरो स्प्लेंडर,

०१ होन्डा सिबी शाईन

अशा एकुण ०९ मोटरसायकली एकुण किंमत ७,५०,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन
१) पोस्टे वसंतनगर अप क्रमांक ३४७/२०२३ कलम ३७९ भादंवि, २) पोस्टे दिग्रस अप क्रमांक ६२०/२३ कलम ३७९ भादंवि, ३)
पोस्टे खंडाळा अप क्रमांक ४१६/२३ कलम ३७९ भादंवि असे चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणले असुन हस्तगत केलेल्या
मोटरसायकलची माहीती घेणे सुरु असुन यवतमाळ, परभणी, आदिलाबाद (तेलंगणा) या जिल्हयातील मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपी  १) करन रमेश शिंदे २) अवतारसिंग जंगुसिंग जुनी यांना जप्त मुददेमालासह पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.
दिग्रसचे ताब्यात देण्यात आले असुन पाहीजे असलेला आरोपी

३) अनिल सोळंके याचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप,आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, चालक पोठपनि रेवन जागृत, पोलिस अमंलदार तेजाब रंणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, पंकज पातुरकर, बबलु चव्हाण, पंडागळे, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, चालक अमित कुमरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!