
यवतमाळ शहरात विक्रीकरीता आणलेल्या अवैध देशी गावठी पिस्टलसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…,
यवतमाळ (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयातील अवैध शस्त्र अग्नीशस्त्र वापरुन घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जिल्हयात कोठेही अवैध शस्त्र, अग्नीशस्त्रांचा वापर होवु नये तसेच यवतमाळ जिल्हयातील सार्वजनिक सण उत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे व्हावे याकरीता याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेवून अवैधशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची गोपनिय माहिती काढण्याबाबत पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केल्याने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाना अवैध शस्त्रांसबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असतांना दिनांक १०/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार दिवाळी सणानिमीत्याने पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की, एक काळे शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला इसम अमराईपूरा यवतमाळ ते जि.प. दरम्यान अवैधरित्या देशी कटटा विक्री करण्याचे उद्येशाने बाळगुन आहे. अशा गोपनिय
माहतीवरुन नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता गोपनिय माहिती मधील वर्णनाचा एक इसम जि.प. यवतमाळ चे समोर उभा
दिसला वरुन दोन पंचासमक्ष त्यास त्याचे नांव गांव पत्ता विचारला असता त्याने आपले नांव
अनुप उर्फ रॉकी दिनानाथ तिवारी वय २३ वर्ष रा. सारस्वत चौक, यवतमाळ


असे सांगीतल्याने त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये १) एक देशी बनावटीचा लोखंडी देशी कट्टा (अग्नीशस्त्र ) कि.अं. ३०,०००/- रु

२) दोन नग जिवंत काडतुस (राउंड) कि.अं. ६००/- रु

३)एक नग मोबाईल फोन कि.अं. ५,०००/- रु चा असा एकुण ३५,६००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद वेळी आरोपीस देशी कटट्यासंबधाने विचारणा केली असता सदरचा देशी कटटा हा
अजय उर्फ गोलु सोळंकी रा. अमराईपूरा, यवतमाळ
याने विक्री करण्याकरीता दिला असल्याचे सांगीतल्याने सदर प्रकरणात आरोपी नामे
१) अनुप उर्फ रॉकी दिनानाथ तिवारी वय २३ वर्ष रा. सारस्वत चौक, यवतमाळ
२) पाहिजे आरोपी नामे अजय उर्फ गोलु सोळंकी रा. अमराईपूरा,
यवतमाळ
यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पो.नि. स्थागुशा आधारसिंग सोनोने, सपोनि विवेक देशमुख, पोलिस अंमलदार बंडु डांगे, साजीद सैयद, अजय डोळे, रुपेश पाली, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे सर्व स्थागुशा यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.


