वणी येथुन चोरीस गेलेले किंमती हायवा ट्रक २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत…
वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २७/१०/२०२३ रोजी पोलिस ठाणे वणी येथे फिर्यादी सो. तसलीम समीर रंगरेज रा. एकतानगर वणी यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती समीर परवेज रफीक रंगरेज यांच्या मालकीचे टाटा हायवा कंपनीचे ट्रक क्रमांक
MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 एकुण किमंत २७,०००,००/-रु असे इतर वाहनांसह वणी वरोरा रोडवरील
लार्ड्स बार समोर ठेवून असलेले दिनांक २७/१०/२०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले आहेत. अशा फिर्याद वरुन पोलिस ठाणे वणी येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रमांक ११३३ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी तसेच पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पो.स्टे. वणी तसेच स्था. गु.शा. येथील वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. दोन्ही पथकांनी आपआपले गोपणीय बातमीदार नेमुण तसेच तांत्रीक बाबींची मदत घेवुन अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला होता अशातच दिनांक २८/१०/२०२३ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपणीय बातमीदार मार्फत सदरची चोरी गेलेली वाहने ही यवतमाळ येथील आर्णी रोड बायपास जवळ असलेल्या धरमकाटया जवळील मोकळया जागेत ठेवून आहेत अशी विश्वसनीय खबर मिळाल्याने स्था. गु.शा. कडील पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठुन माहिती प्रमाणे शोध
घेत असतांना सदर चोरीस गेलेली वाहने मो. शगीर मो. जाबीर अन्सारी याने चोरुन आणली असल्याची गोपणीय माहिती
मिळून आल्याने
१) मो. शगीर मो. जाबीर अन्सारी रा. गुलमोहर पार्क यवतमाळ
यास ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्याने सदरची वाहने त्याचेकडे कामाला असलेले
२) कुंदन ओमप्रकाश तिजारे वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर,कन्हान नागपुर
३) निकेश नामदेव वासनीक वय २३ रा. आंबेडकर चौक कन्हान नागपुर
यांचे मार्फतीने वणी येथुन चोरली असल्याची कबुली दिली आहे. चोरी गेलेले टाटा हायवा कंपनीचे ट्रक क्रमांक MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 किमंत २७,०००,००/- रु तसेच आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन XUV 300 किमंत १०,०००,००/- रु असा एकुण ३७,०००,००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन २४ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कार्यवाही कामी पोलिस ठाणे वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ.. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, गणेश किंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, आधासिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था. गु. शा. अजित जाधव पोलिस निरीक्षक, पो.स्टे. वणी यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस
अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत
मडावी, नरेश राउत, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. वणी येथील सपोनि माधव शिंदे, पोलिस अंमलदार
सुदर्शन वानोळे, इकबाल शेख, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख, गजानन गेडाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली
आहे.