
गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ आधारसिंग सोनोने यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या हत्या त्यामुसार. दिनांक 14/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील एक पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पथकास मुखबीरव्दारे गोपनिय माहीती मिळाली की, मंगरुळपिर जि.वाशिम येथुन एका पिकअप बोलेरो वाहनांतून गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस दारव्हा, दिग्रस, पुसद, मार्ग निजामाबाद येथे घेवून जात आहे अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शहानिशा करुन कारवाई करणे करीता दोन पंचाना सोबत घेवून पुसद येथील पुस नदी जवळ सापळा लावून नाकाबंदी केली असता दिग्रस कडुन एक संशयीत पिकअप बोलेरो येत असल्याचे दिसून आल्याने सदर वाहनास रोडच्या बाजूला थांबवून त्याची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनामध्ये लोखंडी टाकी, त्यावर फळ विक्री व वाहतुक करीता उपयोगात येणारे कॅरेट ठेवून त्याचे खाली लोखंडी टाकी त्यामध्ये 15 ते 16 गोवंशीय बैलाचे मांस (गोमांस) मिळून आल्याने सदर वाहन चालक
1) मोहम्मद तनवीर शेख बुरहान वय 26 वर्षे,


2) मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील वय 27 वर्षे,

3) मोहम्मद जुनेद बशीर वय 27 वर्षे,

सर्व रा. टेकडी पुरा अक्सा मस्जीद, जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि.वाशिम असे असून सदरचे गोवंशीय बैलाचे मांस मो इब्राहिम मो.नुर रा. टेकडी पुरा अक्सा मस्जीद, जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि.वाशिम यांच्या सांगण्यावरुन निजामाबाद येथे घेवून जात असल्याचे सांगितल्याने पिकअप बलेरो वाहन, 1470 किलो मांस (गोमांस) दोन मोबाईल असा एकूण 12,11,100 /- रु मुद्देमाल जप्त करुन वरील इसमां विरुध्द पोलिस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप, आधासिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि, गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, पोउपनि रेवन जागृत पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा पंकज पातुरकर, नापोकों कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, दिंगबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


