विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार
दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे  सिध्दार्थ  व लखन उर्फ जानी
आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान  असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) घेवून फिरत आहेत.

खबरचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने क्षणाचाही विलंब न करता पो.स्टे. यवतमाळ शहर येथील पोलिस
स्टाफ मदतीस घेवुन तात्काळ माहिती प्रमाणे असलेल्या घटनास्थळावर पोहचुन संशयीतांचा शोध घेत असतांना दोन इसम
आंबेडकर चौक ते डोर्ली रोड दरम्याण असलेल्या हनुमान मंदिर व नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर संशयास्पद स्थितीत उभे असतांना दिसुन आले वरुन त्यांना ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्यांनी दिलेल्या माहीती प्रमाणे
त्यांची नावे





१) सिध्दार्थ वासुदेव गायकवाड वय ३० वर्षे, रा. सेवानगर यवतमाळ २) लखन उर्फ जानी विजय चंदेल वय २८वर्षे, रा. सेवानगर यवतमाळ



असे सांगीतले त्यावरुन त्यांची अंगझडती घेतली असता सिध्दार्थ वासुदेव गायकवाड याचे



कब्जात एक देशी बनावटीची मॅग्जीनला काळया रंगाचे फायबर कवर असलेली पिस्टल किंमत अं. ५०,००० रुपये ची मिळुन
आली तसेच लखन उर्फ जानी विजय चंदेल याचे अंगझडतीत त्याचे पॅन्टचे खिशात एक जिवंत काडतुस किंमत १००० रुपयाचे
मिळुन आल्याने पिस्टल व जिवंत काडतुस असा एकुण ५१,०००/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी विरुध्द
भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ व कलम १३५ म.पो.का अन्वये पो.स्टे. यवतमाळ शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक, डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप,  आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि संतोष मनवर, पोलीस अंमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे सर्व स्थागुशा यवतमाळ, तसेच सपोनि आत्राम, पोलिस अंमलदार अन्सार बेग, प्रदिप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे पो.स्टे. यवतमाळ शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!