
गौणखनिज रेतीची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
लाडखेड(यवतमाळ) -प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदयाविरुध्द कारवाई करण्याकरीता पो.स्टे. लाडखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम
धनराज राठोड रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा


हा त्याचेकडील विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीमधुन अडान नदी पात्रातील रेती (वाळु) ची चोरी करुन वडगावं (गाडवे) ते देवरवाडी मार्गे चोरटी वाहतुक करीत आहे. अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने पथकाने तात्काळ रवाना होवुन वडगावं (गाडवे) ते देवरवाडी मार्गावरील देवरवाडी मारोती मंदीरा जवळ सापळा लावुन थांबले असता पहाटे ०९/०० वा. माहिती प्रमाणे लाल रंगाचे मुंडके व ट्रॉली असलेले ट्रॅक्टर येतांना दिसल्याने पो.स्टाफ चे मदतीने इशारा देवुन त्यास थांबवुन ट्रॅक्टर चालकास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव मंगेश सुखदेव जाधव वय २७ वर्षे रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा जि. यवतमाळ असे असल्याचे
सांगीतल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदरचा ट्रॅक्टर हा धनराज भिलसिंग राठोड वय ३५ वर्षे, रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा जि. यवतमाळ यांचे मालकीचा असल्याचे व तो ट्रॅक्टरचा मालक असल्याचे सांगीतल्याने सदरचा विना क्रमांक असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली कि.अ. १०,००,०००/-रु व त्यामध्ये असलेली रेती (वाळु) कि.अ. १०,०००/-रु असा एकुण १०,१०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी

१) मंगेश सुखदेव जाधव वय २७ वर्षे,

२)धनराज भिलसिंग राठोड वय ३५ वर्षे, दोन्ही रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा जि. यवतमाळ
यांचे विरुध्द पोलिस ठाणे लाडखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप,आधारसिंग सोनोने पो.नि.स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि गणेश वनारे, पोलीस अंमलदार महमंद जब्बार चव्हाण, सोहल बेग मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमीत झेंडेकर, अमित कुमरे सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


