चोरीच्या दुचाकी स्क्रॅप करुन विकणारी टोळी यवतमाळ स्थागुशा पथकाने केली जेरबंद…
मोटारसायकल चोरुन भंगारमधे विकणारे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात…
यवतमाळ (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त पथकांना गुन्हेगारांची गोपनीय माहीती काढुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या पथकाने गोपनीय माहीतीच्या आधारे मोटर सायकल चोरी कॅमेरा ईसम
1) सार्थक नितीन गांजरे रा. शिवाजी नगर, दारव्हा जि. यवतमाळ
याचे ताब्यातुन अँक्टिव्हा व ॲक्सेस असे दोन चोरीच्या मोटारसायकल जप्त करुन आरोपीस पो.स्टे. यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपी
2) ब्रिजेश रमेश गायकवाड रा. सिध्दार्थ नगर, दारव्हा जि. यवतमाळ
याने विकत घेतलेली चोरीची/संशईत मोटारसायकल जप्त केली असता सदर मोटारसायकल ही पोलिस स्टेशन,साखरखेर्डा जि. बुलढणा येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याने पुढील कायदेशीर कारवाईकामी पोलिस स्टेशन दारव्हा यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच भंगार खरेदी/विक्री करनारे
3) नासिर खान अन्सार खान रा.खाटीकपुरा दारव्हा जि.यवतमाळ
याच्या ताब्यातुन भंगार मध्ये विक्री करण्याकामी तोडण्यात आलेली एक स्प्लेन्डर मोटारसायकल स्पेअर जप्त केले असता सदर मोटारसायकल ही पोलिस स्टेशन अवधुवाडी येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याने आरोपीस पोलिस स्टेशन. अवधुतवाडी यांच्या ताब्यात पुढील कारवाईस्तव देण्यात आले आहे. या मध्ये तीन आरोपीतांकडुन चार मोटारसायकल ज्यांची किंमत अं.1,70,000/- रु. या जप्त करण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही डॉ.पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, चिलुमुला रजनीकांत उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा, यांच्या मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, स.पो.नि. गणेश वनारे, पोलिस अंमलदार बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल बेग, अमित झेंडेकर, अमित कुमरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.