मनोज जरांगे यांचे सभेत सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन, वसंतनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगीरी
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीतील चैन चोरी करणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात,एकुण ६,५१,५००/- रू. चा मद्देमाल हस्तगत…

वसंतनगर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वसंतनगर, पुसद हद्दीत दि. ०५/१२/२०२३ रोजी फिर्यादी अभिजित किशोर पानपट्टे वय ३२ वर्ष रा. हनुमान वार्ड पुसद जि. यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन वसंतनगर येथे येवुन तक्रार दिली की,
पुसद येथे मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेत असतांना जमलेला गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याची चैन ४ तोळे किं. अं. २,५०,०००/- रु. चोरून नेली अशा फिर्याद वरून पोलिस स्टेशन  वसंतनगर येथे अप क. ५६९/ २०२३ कलम ३७९ भा.द.वी प्रमाणे गुन्हा  नोंद असून सदरच तपास हा पोलिस निरीक्षक प्रवीण नाचनकर पो.स्टे. वसंतनगर यांनी पोउपनि योगेश जाधव व गुन्हे प्रकटी पथक कर्मचारी यांना अज्ञात आरोपी इसम शोध घेणे करीता नियुक्त करण्यात आले. तपासा दरम्यान रॅलीतील मोबाईलमध्ये काढलेले फुटेज व फोटो चेक करीत असतांना व्हिडीओमध्ये संशयीत इसम हा फिर्यादी याची चैन तोडतांना आढळून आला. सदर इसमाचे फोटो घेवुन बाहेर जिल्हयात गोपनीय माहितगाराला सदर चैनचे तोडतांना संशयीत इसमाचा फोटो पाठवुन विचारपुस केली असता एका गोपनीय माहितदारांनी कळविले की, हा फोटो सचिन बाळु पवार, वय २७ वर्ष, जात आहीवली हा नाथनगर पाथर्डी, जि. अहमदनगर येथे राहत असुन त्याची अंतर्भुत माहिती जमा करून पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड  यांच्या आदेशाने
उपविभागिय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर व पोलिस निरीक्षक नाचनकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि योगेश
जाधाव सोबत गुन्हे प्रकटीकरण पथक पोहवा  अशोक चव्हाण, मुन्ना आडे, नापोशि संजय पवार, असे जिल्हा अहमदनगर येथे संशीतय इसम यांच्या शोध घेणे कामी दि. ०७/१२/२०२३ रोजी रवाना करण्यात आले.
संशयीत इसमाचा ग्राम पाथर्डी व इतर ठिकाणी असे सतत ०४ दिवस शोध घेतला असता त्यांची अंतर्भत माहिती काढुन तो कलाकेंद्र येथे जाण्याच्या सवयीचा असल्याची माहिती गोपनीय माहितगाराकडुन मिळाली त्याचे फोटो सदर कलाकेंद्र जामखेड येथील कलाकेंद्र वाल्याला दाखविले असता त्यांनी ते फोटो ओळखले व तो जबदंबा कलाकेंद्रामध्ये येत असता असे सांगीतले. आम्ही जगदंबा कलाकेंद्र मध्ये सापळा लावुन बसलो असता तो दि. ०९/१२/२०२३ ला रात्री ०९/०० सुमारस त्याच्या मित्रा सोबत स्विफ्ट गाडी घेवुन जगदंबा कला केंद्र येथे आला तो गाडीतुन उतरचाच आम्ही त्याच ठिकाणी सापळा रचुन पकडले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बाळु पवार, वय २७ वर्ष, रा. पाथर्डी जि. अहमदनगर असे सांगीतले. त्यास पुसद येथील चोरीस गेलेली चैन बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, ती चैन पुसद येथील छत्रपती चौक येथील मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली मधुन त्याने चोरीली आहे. सदर संशयीत
इसम याला ताब्यात घेवून चैन बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, ती चैन ही त्याच्या जवळ असलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये आहे. आरोपी इसम याच्या कडुन चैन कि.अं. २,५०,०००/- रू. व गुन्हयात वापरण्यात आलेली स्वीफ्ट गाडी क. एम. एच. १४ डि.टी. ५८१० कि.अं. ४,००,०००/-रू. तसेच वापरण्यात आलेला मोबाईल कि अॅ. १,५००/- रू. काढून दिल्याने असा एकुण मद्देमाल ६,५१,५००/- रू. ताब्यात घेण्यात आली. सदर आरोपी याला गुन्हात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोउपनि योगेश
जाधव करीत आहे.
सदरची कार्यवाही  डॉ. पवन बंसोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, पंकज अतुलकर, उपविभागिय पोलिस अधिकारी  पुसद यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण नाचनकर, ठाणेदार पोलिस स्टेशन वसंतनगर पो.उप.नि. योगेश जाधव, पोहवा अशोक चव्हाण पोहवा मुन्ना आडे, नापोशि संजय पवार, नापोशि नितीन आडे हे करीत आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!