अवैधरित्या कमरेला शस्त्र लावुन फिरणारा वसंतनगर(पुसद)पोलिसांचे ताब्यात…
वसंतनगर,पुसद(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०३/०१/२०२४ रोजी २०/०० ते २१/४० वा. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयीत ईसम हा मेडीकेअर हॉस्पीटलच्या मागे, वसंतनगर, पुसद वार्को सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने पोलिस स्टेशन ला उपस्थित पथकासह.नमुद ठिकाणी जावुन सदर इसमास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे नाव मोहंमद मजहर उद्दीन मोहंमद नियाज उद्दीन, वय २१ वर्षे, रा. अमन नगर (अ), कुलसुम मस्जिद, हैद्राबाद असे सांगुन त्याचे अंगझडतीचा उद्देश समजावुन सांगुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात त्याचे कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल कि.रु.२०,०००/- मिळुन आली तसेच त्याचे पॅन्टचे उजवे खिशात दोन जिवंत काडतुस कि.रु.२,०००/- मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल कोणाकडुन घेतला बाबत विचारपुस करता त्याने तो २) अमजद खान सरदार खान, ३) सरदार खान अमीरउल्ला खान, दोन्ही रा. वसंतनगर, पुसद यांचेकडुन २ ते अडीच वर्षापुर्वी खरेदी केल्याचे सांगितल्याने वरील मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन पोलिस स्टेशन वसंतनगर येथे अप क्र. ०३/२०२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्याचे कलमाप्रमाणे वरील तिन्ही आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक, डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप,उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा.पोलिस अधिक्षक पंकज अतुलकर, तसेच पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, स्था.गु.शा.यवतमाळ तसेच पो.निरी..प्रविण नाचणकर यांचे आदेशाने स.पो.निरी. देविदास पाटील व पो.स्टे. नेमणुकीचे गुन्हे शोध पथकाचे पोहवा अशोक चव्हाण, मुन्ना आडे, नापोशि संजय पवार, नापोशि सलिम शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.