गुंडप्रवुत्तीच्या प्रेम राठोड याचेवर यवतमाळ पोलिसांची हद्दपारीची कार्यवाही…
घाटंजी हद्यीतील धोकादायक व्यक्तीला केले ०६ महिन्याकरीता हद्यपार,यवतमाळ जिल्हा पोलीसांची कारवाई.
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे घाटंजी हद्दीतील ईसम प्रेम केशव राठोड वय ५० वर्षे रा. किन्ही ता.घाटंजी जि.यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख असल्याने व त्याचे शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवक सार्वजनिक काम पार पाडत असतांना अटकाव करणे, व रेती चोरी करणे गंभीर गुन्हे करण्याच्या सवईचा असल्याने त्याचे विरुध्द पोलिस निरीक्षक निलेश. सुरडकर यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. घाटंजी येथील पोउपनि खाडे,पोलिस अंमलदार साजिद शेख यांनी त्याचा
हद्यपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्फतीने सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, केळापुर यांचे कडे सादर केला होता सदर प्रस्तावास मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,केळापुर यांनी मंजुरी देवुन त्यांस यवतमाळ जिल्हयातुन ०६ महिन्या करीता हद्यपार करण्या बाबतचा आदेश दिनांक ०१/०४/२०२४ रोजी पारीत केला आहे.
जिल्हयात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होवुन त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याने अशा प्रकारे शरीराविरुध्द व संपत्ती विषयक गुन्हे करणारे, अवैध रेती तस्करी, गावटी दारु तसेच टोळीने दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर आगामी काळात MCOCA तसेच MPDA, व महाराष्ट्र पोलीस कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असुन अशा गुन्हेगांराची गय केली जाणार नाही.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप,उपविभागिय पोलिस अधिकारी, पांढरकवडा रामेश्वर वैंजने यांचे मार्गदर्शनात पोलिस
निरीक्षक स्था. गु.शा. आधारसिंग सोनोने, पो.नि. घाटंजी निलेश, तत्कालीन पोउपनि. खाडे, पोलिस अंमलदार साजीद,पो.स्टे. घाटंजी व उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथील पो. अंमलदार रवि सिंहे यांनी यशस्वीरित्या पार पाडली