
पोलिस महासंचालकांच्या हस्ते उत्कुष्ट तपासासाठीचे केंद्रीय ग्रुह मंत्र्यांचे पदक प्रदान….
केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळा पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई रश्मि शुक्ला यांचे हस्ते संपन्न……
पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणा-या पोलिस अधिकारी यांना केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात येते.यामधे सन २०१८ ते २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील एकूण ५४ पोलिस अधिकारी यांना सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे.



राज्य स्तरावरून केंद्र शासनास पात्र पोलिस अधिकारी यांच्या शिफारसी पाठविताना पोलिस महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम पुर्व),विशेष पोलिस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.), गु.अ.वि. पुणे यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

अशा निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामधून प्राप्त झालेल्या शिफारशी अहवालांची निकषांनुसार पडताळणी होवून एकूण २२ पोलिस अधिकारी यांचे शिफारशी अहवाल केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठविण्यात येतात. त्यापैकी राज्यातून दरवर्षी ११ पोलिस अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी करण्यात येते.सन २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान समारंभ दि. १३ जुन २०२५ रोजी पोलिस संशोधन केंद्र, पुणे येथे राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमामध्ये एकूण ११ पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी यांना मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचे पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण व लहान मुलींचे लैंगिक शोषण, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, फसवणूक व मानवी आरोग्यास धोका करणारे गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आधुनिक तपास पद्धीचा अवलंब करून उघडकीस आणलेले आहेत. मा. पोलिस महासंचालक यांनी पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सदरहु समारंभास अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सुनील रामानंद,पोलिस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार,पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे,विशेष पोलिस महानिरीक्षक (रा.गु.अ.के.)डॉ. राजेंद्र डहाळे पोलिस उप महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा)डॉ. बसवराज तेली,पोलिस अधीक्षक, पुणे पथक सौरभ आग्रवाल,पोलिस अधीक्षक (का. व सं.)पोलिस अधिक्षक (आगुशा)पल्लवी बर्गे, पी. आर. पाटील,, श्रीमती वैशाली माने, पोलीस अधीक्षक (तांत्रिक सेवा) याशिवाय इतर पोलिस अधिकारी, निमंत्रक असे उपस्थित होते.



