
अॅानलाईन चक्री जुगारावर युनीट २ चा छापा,मुद्देमाल जप्त….
रहाटगांव चौक येथील ऑन लाईन लॉटरी सेंटरमध्ये अवैधरित्या चालना-या ऑनलाईन जुगारावर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कार्यवाही….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी गुन्हे शाखेतील पथकाची विशेष बैठक घेवुन शहरात चालणा-या अवैध्या धंदे विरोधात प्रभावी मोहिम राबविण्याबाबत आदेशित केले होते.त्या अनुषंगाने गुन्हे शाखा माहीती घेत असतांना दि २६ जुन २०२५ रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, रहाटगांव चौक येथील फोरसिजन मार्केट मध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये फन टारगेट या ऑनलाईन वेब साईडवर अवैध असलेले चक्री या ऑन लाईन खेळावर पैसे लावुन जुगार सुरू आहे.



याबाबत गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी लागलीच सदरची माहीती पोलिस आयुक्त यांना देवुन वरीष्ठांचे परवानगीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण सह गुन्हे शाखा युनिट २ चे पथक व दोन पंच असे मिळालेल्या माहीती प्रमाणे रहाटगांव चौक येथिल फोरसिजन मार्केट मध्ये ऑन लाईन लॉटरी सेंटरमध्ये जावुन छापा टाकुन पाहणी केली असता लॉटरी सेंटर मधिल संगणकाचे स्क्रिनवर फनटार्गेट या वेबसाईटवर अवैध असलेले चक्री हे ऑनलाईन गेम पैशाची देवान घेवान करून १ इसम खेळ खेळवितांना व काही इसम खेळ खेळातांना दिसुन आले. पोलिस आल्याची चाहुल लागताच खेळ खेळणारे इसम पळून गेले.

यावरुन संगणक हातळणा-या इसमास वैध्य परवानाबाबत विचारणा केली असता त्यानी त्याचेकडे शासनाचा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले वरून खेळ खेळविणा-या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्यानी त्याचे नांव गोपी राजु डाखोरे वय ३० रा. अप्पर वधों कॉलनी अमरावती असे सांगीतले. त्याचे ताब्यातून ऑनलाईन जुगाराचे साहीत्य व नगदी असा एकूण २७९८०/- रू.चा मुद्देमाल त्याचे ताब्यातुन जप्त करून ताब्यात घेण्यात आले तसेच. जुगार खेळविणा-या इसमास विश्वासात घेवुन अवैध्यरीत्या ऑनलाईन लॉटरी सेंटर मध्ये जुगार चालविणा-या मालकांबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, सदरचे ऑनलाईन सेंटरचे मालक १) संकेत कुलट रा. राठी नगर अमरावती २) रोहन तायडे रा. देशमुख लॉन अमरावती हे असल्याचे सांगीतले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही.

त्याचप्रमाणे सदर चक्री गेम चालविण्याकरीता लागणारी आयडी, पासवर्ड व बॅलेन्स गणेश झाडे रा. यवतमाळ यांचे कडुन ऑनलाईन घेतो असे सांगीतले. सदर इसमांचे कृत्य महा जुगार अॅक्ट प्रमाणे होत असल्याने वर नमुद ४ इसमा विरूध्द पोलिस स्टेशन नांदगावपेठ येथे ४,५ महा जुगार अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोदं करण्यात आला असुन पुढिल तपास पो.स्टे. नांदगावपेठ करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अरविद चावरीया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोहवा गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, पोकॉ योगेश पवार, राजीक रायलीवाले, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चेतन कराडे, चापोहवा संदीप खंडारे, राहुल दुधे यांचे पथकाने केली आहे.



