बार्शीटाकळी पोलिसांनी दिले दोन गोवंशीय जनावरांना जिवनदान…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ॲापरेशन प्रहार अंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांनी दिले २ गोवंशाना जिवनदान,घटनास्थळावरुन गोमांस केले जप्त….

बार्शीटाकळी(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी जिल्हयातील अवैध धंदे यांचेवर अंकुश घालने करीता “ऑपरेशन प्रहार” योजना राबवत असुन गोवंश तस्करी व वाहतुक करण्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.त्याअनुषंगाने आज दिनांक २९/०६/२०२५ रोजी पोलिस स्टेशन बार्शीटाकळी येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की, २ गोवंश जातीचे जनावरे कत्तली करीता कुरेशीपुरा बार्शीटाकळी येथे शेख अरिफ अ. अजिज याचे घराचे ओसरीत निर्दयतेने बांधुन ठेवलेले आहेत.







अशा गोपनीय माहितीवरुन पो. स्टॉफ सह मिळलेल्या माहिती प्रमाणे सकाळी ०५.४५ वा दरम्यान घटनास्थळी जावुन दोन पंचा समक्ष पाहणी केली असता तिथे ०२ गोवंश जातीचे जनावरे मिळून आले. सदरचे दोन्ही गोवंश हे बैल जातीचे आहेत ते निर्दयतेने आखुड दोराने कत्तली करीता बांधुन ठेवलेले मिळाले. तसेच सदर ठिकाणी दहा किलो गोवंश जातीचे मास मिळुन आले वरुन सदरचे गोवंश व मास एकुण. (७७,०००/- रु) किंमतीचे जप्त करुन पो. स्टे ला आणुन गोवंश जातीचे बैल पुढील देखरेखी करीता व संगोपणा करीता आदर्श गोसेवा संस्थान, म्हैसपुर येथे दाखल करण्यात येणार असुन जप्त मास हे सि. ए. तपासणी करिता पाठविण्यात येणार आहे.



सदर प्रकरणी शेख अरिफ अ. अजिज याचे विरुध्द कलम-५, ५अ, ५ ब, ०९ महा. प्राणि संरक्षण अधिनीयम १९७६, कलम ११ प्रांण्याना कृतेने वागविणे प्रतिबंध करणे सहकलम- ३२५ बि. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहा पोलिस अधिक्षक तथा  उपविभागीय पोलिस अधिकारी  अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस स्टेशन बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन पोउपनि. सुहास गोसावी,पोशि अमोल हाके, प्रविण महस्के, मपोशि विशाखा घायल यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!