
देशी विदेशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही….
मूर्तीजापूर मध्ये अवैध दारू वाहतुकीवर नाकाबंदी करुन स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारू चा 05 लाख 70 हजार चा साठा जप्त जप्त….
मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने आज दि ०१ जुलै.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी नाकाबंदी चे निर्देश दिल्या वरुन पोलिस स्टेशन मूर्तिजापूर शहर हददीतील बुब पेट्रोल पंप जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहीती मिळाली की योगेश अनिल कनोजे वय 33 वर्ष, रा. समता नगर, हा अवैधरित्या दारूची वाहतूक करत आहे



अशा बातमी वरुन बुब पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी करुन दारू रेड केला असता त्यामधे देशी दारू 15 तसेच विदेशी दारू 2 बॉक्स कि 69,920/- चारचाकी गाडी कि. 5,00,000/-एकूण कि. 5,69,920/- मिळुन आला यावरून मूर्तिजापूर शहर पो. स्टे. ला दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक,, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिi विजय चव्हाण.,पोउपनि गोपाल जाधव,श्रेणी पोउपनि दशरथ बोरकर,पोहवा खुशाल, सुलतान पठाण,पोशि सतिश, अन्सार. स्वप्निल, गोकुळ चव्हाण यांनी केली.




