अखेर झेब्रा क्रॅासिंग व स्टॅाप चे पट्टे मारल्याने आर्वि नाका व शिवाजी चौक येथील वाहतुक सिग्नल पुर्वरत सुरु,वाहतुक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे प्रयत्नांना यश…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अखेर वाहतूक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग चे पांढरे पट्टे मारण्याचे कामास सुरुवात,दिर्घ प्रतिक्षेनंतर शहराची वाहतुक नियंत्रनाची समस्या सुटनार,वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील यांचे प्रयत्नांना यश…..

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक  अनुराग जैन यांच्या संकल्पनेतून व वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शना खाली वर्धा शहरामध्ये वाहतूक नियंत्रीत होणे करिता वाहतूक सिग्नल हे सुरु करण्यात आले होते त्यात आर्वी नाका व श्री शिवाजी महाराज चौकात सिग्नल व्यवस्था ही सुरु करण्यात आलेली होती व आरती चौक व बजाज चौक हे सिग्नल उभारणीचे कामही सुरु आहे,







परंतु वाहतूक सिग्नल चालू केल्यावर तेथे स्टॉप लाईन व झेब्रा क्रॉसिंग लाईन या आखण्यात आलेल्या नव्हत्या त्यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडायचा की नेमकं थांबायच कुठे यांत त्यांची नाराजीही व्यक्त केली होती त्यावरून पोलिस अधिक्षक यांनी वाहतूक सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंग लाईन व स्टॉप लाईन मारण्याच्या सुचना नगरपरिषद विभागास दिल्याने आज पासून सिग्नलवर स्टॉप लाईन व झेब्रा क्रॉसिंग लाईन या आखल्या जात आहेत, त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीस शिस्त लागेल



तरी वाहन चालक यांनी वाहतूक सिग्नलचे नियमाचे पालन करावे असे आवाहान जिल्हा वाहतुक पोलिसांनी केलेले आहे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!