
खंडनीसाठी अपहरण केलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने कोटा राजस्थान येथुन घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने दोन खंडनीखोरांना महाराष्ट्र व राजस्थान असा प्रवास करत पिस्टल व जिवंत काडतुस व वाहन असा 5,51,000/- -रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात….
बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.22 सप्टेबर 2025 रोजी फियांदी जयदीप नक्कु गिडा रा. अडाजन जि. सुरत (गुजरात) यांनी पोलिस स्टेशन मलकापुर शहर येथे तक्रार दिली की त्यांची क्रुड ॲाईंलची कंपनी असुन महाराष्ट्रामधे कंपनीच्या आईंलचं डिस्ट्रीब्युशन सेल करीता 1) जयेश ऊर्फ जिराग 2) हिम्मतभाईं हे मलकापूर शहरात राहत होते, ते दि.19/09/2025 रोजी फिर्यादी यांना मिळून न आल्याने त्या बाबत मिसींग तक्रार पोसिस स्टेशनला नोंद करण्यात आली होती



यादरम्यान दि.22/09/2025 रोजी आरोपींनी फिर्यादी यांना कॉल करुन सांगीतले की त्यांच्या कंपनीचे जयेश ऊर्फ जिराग 2) हिम्मतभाई हे आरोपीच्या ताब्यात असन, त्यांना साोडविण्यासाठी 20,00,000/-रु. खंडणी मांगीतली. खंडणी न दिल्यास किवा पोलिसांना माहिती दिल्यास अपहरण केलेल्या व्यक्तींना जिवे मारण्याची धमकी दिली यावरुन फियांदी यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे. मलकापूर शहर येथे अपक्र. 599/2025 कलम 140(2).3(5) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद असून तपास सुरु होता, पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी गुन्हयाची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेऊन, गुन्हाची लवकरात लवकर उकल होऊन, अपहरण झालेल्या व्यंक्तींची सुखंरुप सुटका होउन गुन्द्यत सहभागी आरोपींचा शोध घेणेबावत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक.सुनील अंबुलकर यांना आदेशीत केले या आदेशावरुन पोनि.सुनील अंबुलकर यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना आरोपिंचा शोध घेऊन कार्यवाही करणेबाबत सुचित केले.
सदर गुन्ह्याचे तपासात तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्यातील आरोपी हे त्यांचा सतत ठावटिकाणा बदलत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर आरोपिंना पकडण्यासाटी त्यांचा पाटलाग करणे गरजचे झाले. त्यामुळे पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोॉनि, सुनिल अंबुलकर यांचे नंतृत्वात स्था.गु.शा.चे पथक तात्काळ आरोपीच्या मार्गावर रवाना करण्यात आले, सदर पथकाने कोणतीही विश्रांती न घेता सतत 48 तासात 1600 कि.मी. प्रवास करत, यातील आरोपीचा मलकापूर, अकोला, अमरावती, चांदूर रेल्वे परतवाडा, बैतुल, भोपाळ (मध्य्प्रदेश), कोटा (राजस्थान) असा पाटलाग केला. असा पाटलाग सुरु असतांना पो.स्टे, रेल्वे कॉलोनी .कोटा (राजस्थान) यांचे मदतीने आरोपींना नॉर्दन चाौफुल्ली-कोटा येथे मोट्या शिताफीने व धाडसाने पकडून त्यांच्य ताब्यातून अपहरण झालल दोन्दी ईसम यांची सुखरुप सुटका केली.

गुन्द्यात खालील मुदेमाल व आरोपींना ताब्यात घेण्यात आले
1) मो. जुनद ‘मोहम्मद इमरान ‘वय 30 वर्षं रा. अमरावता 2). निहाल अहमद फिरोज अहमद वय 26 वर्पें रा, अमरावती तसेच दि.23/09/2025) हस्तगत मुद्देमाल :न 1) देशी बनावटीची 02 पिस्टल कि. 50.,000-रु 3) जिवंत काडतूस-। किं. 1.000/-रु. 2) वेरना कंपनीची कार (वाहन) कि, 5.00,000/-रु… असा एकूण- 5,51,000/-रु.चा मुद्देमाल तसेच सुटका केलेल्या व्यक्तीच नांव: I) जयेश चंद्रकांत दत्तनी वय ४7 वर्ष.2) हिम्मत भाईं पंडीया वय ५२ वर्ष- दोन्ही रा. गुजरात ह.मु. मलकापूर गुन्हाचा पुढील तपास : वरील आरोपीना पो.स्टे, मलकापूर शहर यांच्या ताव्यात देण्यात आले असून, गुन्ह्यचा पढील तपास पो.स्टें मलकापर शहर करीत आहेत,
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निलेश तांबे,यांचे आदेशान्बये अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा प्रभार खामगाव अमोल गायकवाड. यांचे मर्गंद्शंनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांचे नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहवा. शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोशि गजानन गोरले नेमणूक स्या.गुशा, बुलढाणा, श्रेणी पोउपनि. सुरेश रोकडे, पोशि. संतोप पंढारकर, ईश्वर वाध, सुरज चौधरी पो.स्टे. मलकापूर शहर, पोहवा.राजू आडवे, पोशि.कैलास टोंबरे.पवन मखमले, ऋयीकेश खंडेराव. यांनी केली़




