गोंदियात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ९३४ ग्रॅम गांजासह महिला जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव तालुक्यातील मौजा भंडगा येथे छापा टाकून अवैध रित्या गांजा विक्री करणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला अटक केली आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी कडक सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, मौजा भंडगा येथील पुष्पा उर्फ मंगला मोतीराम मौजे ही महिला आपल्या घरी गांजाची साठवणूक करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.



या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुष्पा हिच्या घरावर छापा टाकला. झडती दरम्यान, घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत ९३४ ग्रॅम वजनाचा हिरवा, ओलसर गांजा (पाने, फुले, बिया आणि शेंडे-बोंडे) मिळून आला. पोलिसांनी हा गांजा आणि व्यवसायासाठी वापरला जाणारा एक ‘पोको’ कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३ हजार ४०० रुपये इतकी आहे.

आरोपींची साखळी आणि गुन्ह्याची नोंद

पोलिसांनी आरोपी पुष्पा हिच्याकडे विचारपूस केली असता, तिने हा गांजा गोंदियातील दोन व्यक्तींकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावरून आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तिन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कारवाईत सहभागी पथक

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज राजुरकर, पोलीस हवालदार दिक्षीतकुमार दमाहे, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, महिला पोलीस शिपाई स्मिता तोंडरे आणि चालक पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!