
जालना: सराईत वाळू तस्करावर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी हकालपट्टी
वाळू तस्करावर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी कारागृहात रवानगी
वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गोंदी पोलिसांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (MPDA Act 1981) च्या कलम ३(१) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत पाठवला होता. या प्रस्तावाला माननीय जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी ०२ जानेवारी २०२६ रोजी मंजुरी दिली होती.ही धडक कारवाई जालनाचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, आणि अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपीची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
-
नाव: समीर महेबुब पठाण (वय ३१ वर्षे)
-
राहाणार: दुनगाव, ता. अंबड, जि. जालना

-
गुन्हे: आरोपी समीर पठाण याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात वाळू चोरी करणे, अवैध वाळू तस्करी करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि सार्वजनिक रस्त्यावर सामान्य लोकांना मारहाण करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.
अशी झाली अटक
स्थानबद्धतेचा आदेश निघाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. परंतु, २४ जून २०२६ रोजी गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अमोल गुरले आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी समीर पठाण याला वडीगोद्री (ता. अंबड, जि. जालना) येथून ताब्यात घेतले.

१ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात रवानगी
माननीय जिल्हादंडाधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार या स्थानबद्ध आरोपीची ०१ वर्षाच्या कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात येत आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
पथकातील अधिकारी व अंमलदार:

-
सपोनि अमोल गुरले (प्रभारी अधिकारी, गोंदी पोलीस ठाणे)
-
पोउपनि हरी जंगले
-
पो.शि. १४ एस. के. सिद्दीकी
-
पो.शि. १८१ जी. पी. भवरे
-
पो.शि. ८०४ ज्योतीलाल राठोड
-




