अमरावती: चोरीच्या बाईक आणि मोबाईलसह आरोपी गजाआड; गाडगेनगर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल जप्त; गाडगेनगर पोलिसांकडून आरोपीला बेड्या!

अमरावती: गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीची मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने जाळ्यात ओढून अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची मोटरसायकल आणि एक मोबाईल असा एकूण ६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई

सदर यशस्वी कामगिरी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ साहेब (परिमंडळ क्र. १), सहाय्यक पोलीस आयुक्त  शिवाजीराव बचाटे साहेब (गाडगेनगर विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक  गारेखनाथ जाधव साहेब, क्राईम पो.नि. विजया पंधरे व प्रशासन पो.नि. पाचकवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



घटना काय होती?

१२ जून २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी ऋषिकेश साहेबराव घाटे (वय २७ वर्षे, रा. भिम नगर, अमरावती) यांची हिरो होंडा स्पेंडर प्लस मोटरसायकल (क्र. MH 27 CG 9628) आणि व्हीओ (Vivo) कंपनीचा मोबाईल भिम नगर जवळील सरकारी संडास जवळून चोरीला गेला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६५२/२०२६, कलम ३०३ (२) भा.न्या.सं. (भारतीय न्याय संहिता) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी रचला सापळा

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला (गुन्हे शोध पथक) गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. एक इसम तहसील ऑफिसजवळ चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची ती माहिती होती. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने तातडीने तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला. संशयित इसम मोटरसायकलसह येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.



आरोपीची कबुली आणि मुद्देमाल जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव जय शिवानंद लोखंडे (वय १९ वर्षे, रा. शेमलाई, पोस्ट झोडगा, ता. कारंजा, जि. वाशीम; सध्या मुक्काम: भिम नगर, सावळे गल्ली, अमरावती) असे सांगितले.

त्याच्या जवळील हिरो होंडा स्पेंडर प्लस मोटरसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने ती आणि त्यासोबत असलेला व्हीओ कंपनीचा मोबाईल भिम नगर जवळील सरकारी संडास जवळून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून:



  • हिरो होंडा स्पेंडर प्लस मोटरसायकल (क्र. MH 27 CG 9628): किंमत रु. ५०,०००/-

  • व्हीओ (Vivo) कंपनीचा मोबाईल: किंमत रु. १५,०००/-



  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. ६५,०००/- जप्त केला आहे.

  • कारवाई करणारे पथक:

  • गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि.) सागर ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ.) प्रकाश मेश्राम, पोलीस हवादार (पोहवा.) निलेश जुनघरे, अमोल यादव, नपोका. विनोद मालवे, आशिष ठाकरे, पोशि. सिद्धार्थ शृंगारे आणि सचिन गौरखेडे यांनी ही कामगिरी चोखपणे पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!