नवापुरात ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नवापूर पोलिसांची मोठी कारवाई: ५ लाख २० हजारांचा गुटखा आणि ३० लाखांचा कंटेनर जप्त

नवापूर: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू आणि ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुभाष भोये यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.

गुप्त माहितीवरून लावला सापळा

२६ जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सुरत (गुजरात) कडून विजयवाडा (आंध्र प्रदेश) कडे जाणाऱ्या एका ट्रक/कंटेनरमधून विविध साहित्याच्या पार्सलसोबत सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.



या माहितीच्या आधारे, नंदुरबार उपविभागाच्या पोलीस अधीक्षक  अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ रोडवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री अंदाजे २:०० वाजेच्या सुमारास संशयित कंटेनर (क्रमांक: RJ 19 GK 1963) थांबवून त्याची झडती घेतली असता, त्यात खालील मुद्देमाल आढळून आला:

  • मेजबान जाफरानी जर्दा (MEZBAN ZAFRANI ZARDA): प्रत्येकी ४४० रुपये किमतीचे एकूण ५०० मोठे पाकीट (एकूण किंमत: २,२०,०००/- रुपये).



  • सुगंधित तंबाखू: विनालेबल असलेले गोल्डन रंगाचे ३० मोठे पाकीट (प्रत्येकी अंदाजे वजन १० किग्रॅ). प्रति किलो १,००० रुपये प्रमाणे (एकूण किंमत: ३,००,०००/- रुपये).

  • कंटेनर: अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्रमांक RJ 19 GK 1963, अंदाजे किंमत: ३०,००,०००/- रुपये).



एकूण जप्त मुद्देमाल: ३५,२०,०००/- रुपये (पस्तीस लाख वीस हजार रुपये).

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी व गुन्हा दाखल

हा प्रतिबंधित मुद्देमाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नंदुरबार येथील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाशी संपर्क साधला. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास दौले यांनी नवापूर पोलीस ठाण्यात हजर राहून मालाची खात्री केली. हा साठा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५५५/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांसह, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७५, २७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



चालकाला अटक

या गुन्ह्यात कंटेनर चालक कायमदीन खान सुलतानखान (वय २२ वर्षे, व्यवसाय: ड्रायव्हर, रा. श्यामपुरा, ता. गिरा, जि. बाडमेर, राज्य: राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे, पोलीस हवालदार दिनेशकुमार वसुले, पो.हे. किशोर वळवी, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, अतुल पानपाटील, समाधान केंद्रे आणि संजय गावीत यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!