
वर्ध्यात पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर धाड; २८ हजारांचा माल जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल
वर्ध्यात पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकाची दारूबंदी विरोधात मोठी कारवाई ; आर्वीत २८,६०० रुपयांच्या अवैध दारूसाठ्यासह आरोपी अटकेत
आर्वी (वर्धा): वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि तस्करीविरोधात सुरू केलेल्या विशेष दारूबंदी मोहिमेला मोठे यश येत आहे. या मोहिमेतंर्गत काल, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अवैध दारू धंद्यावर धाड टाकून तब्बल २८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या एका कार्यवाहीत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आर्वी उपविभागाचे विशेष दारूबंदी पथकातील देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. आर्वी येथील विठ्ठल वॉर्ड भागात आरोपी दर्शन कौर प्रकाश बावरी हा बेकायदेशीरपणे दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विठ्ठल वॉर्डातील संबंधित ठिकाणी प्रोव्ही. रेड (छापा) टाकली.

या छाप्यादरम्यान आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर देशी दारू आणि बिअरचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २८,६०० रुपये आहे. याप्रकरणी आरोपी दर्शन कौर प्रकाश बावरी याच्याविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४४३/२६, कलम ६५ (ई) आणि ७७ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा (म.दा.का.) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विशेष दारूबंदी पथक आर्वी उपविभाग चे पोउपनि कल्पेश मगरे, पोलीस हवालदार प्रफुल डफ, पोलीस शिपाई अमोल तिजारे आणि महिला पोलीस शिपाई शिल्पा राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आर्वी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.







