
स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट सेवेबद्दल वर्धा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचा पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्धा जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कवायत मैदानावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. व पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि सन्मानपत्र महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेसाठी वर्धा जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यासह चार अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले:

-
विनोद माणिकराव चौधरी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
शिवकुमार बाबाराव कुंभारे

-
गजानन जनार्दन लामसे
-
पंकज डहाके

-
सचिन माडवे
विशेष कामगिरी आणि सत्कार

-
PITNDPS अन्वये कारवाई:
-
कुप्रसिद्ध गुन्हेगार राकेश उर्फ भऱ्या सिद्धार्थ जनबंधू (रा. हिंगणघाट) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोहवा उमाकांत लडके, पोहवा रवींद्र घाटउले, पोअं भारत बटुलेकर, पोअं अनंत हराळ व पोहवा संतोष वनस्कर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
-
पुराच्या पाण्यातून नागरिकाची सुटका:
-
३० जुलै २०२६ रोजी अल्लीपूर येथील यशोदा नदीच्या प्रवाहात अडकलेले नागरिक अक्षय मनोहर माटे (वय ३२) यांचे प्राण वाचवल्याबद्दल स.पो.नि. संगीता शंकरराव हलोंडे, पो.उप.नि. वर्षा राजू तांबुळकर, रवी जेठमल वर्मा, अजय पांडुरंगजी घुसे, सतीश ताराचंद हांडे, मंगेश नामदेवराव कन्नाके, रवींद्र बाळकृष्ण चवडे, प्रमोद सखारामजी डिडेल, पंकज रंगरावजी कापसे, नितीश मारोतराव निंबोळकर, विठ्ठल संभाजी केंद्रे आणि रूपेश धनराजजी बोंदरे यांचा सत्कार करण्यात आला.
-
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवले:
-
५ ऑगस्ट २०२६ रोजी विहिरीत उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून (महाबळा ते कोटंबा घाटादरम्यान) त्याला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल स.पो.नि. पंकज गजानन वाघोडे, स.फो. जावेद इद्रीस तांबोळी, पो.हवा. मंगेश ज्ञानेश्वर राऊत व विनोद पुनाजी कोडापे यांचा सन्मान करण्यात आला.
-
तेलंगणा पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र:
-
२५ मे २०२६ रोजी आदिलाबाद व वारंगल (तेलंगणा) येथून घरफोडी करून पळणाऱ्या अट्टळ गुन्हेगारांना मारोडा टोलनाक्यावर नाकाबंदी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अटक केल्याबद्दल सपोनि घनश्याम पाटील, पोउपनि भारतकुमार वर्मा, सपोनि प्रशांत भाईमारे, पोहवा समीर कामडी व पो.कॉ. संदीप बिलकी यांचा तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून प्राप्त प्रशस्तीपत्राने गौरव करण्यात आला.
या प्रसंगी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सर्व सन्मानप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.




