हिंगणघाट पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; २७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, १९ जणांना रंगेहात पकडले

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट (वर्धा):

जामगाव-गोविंदपूर शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगणघाट पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री धाड टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोकड, वाहने आणि मोबाईल असा एकूण २७ लाख ५० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शेतमालकासह १९ आरोपींना रंगेहात अटक केली आहे.



नियोजित धाड अन् रंगेहात पकडले

गोविंदपूर येथील रहिवासी संजय सामरे हा आपल्या शेतातील पत्र्याच्या शेड (बंडी) मध्ये रात्रीच्या अंधारात ५२ पत्त्यांवर पैशांचा हार-जीतचा जुगार खेळवत असल्याची पक्की बातमी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळााली होती.

या बातमीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने १७ ऑगस्ट ते १८ ऑगस्टच्या मध्यरात्री जामगाव-गोविंदपूर शेतशिवारातील संजय सामरे याच्या शेतातील बंडीची घेराबंदी करून पंचासमक्ष धाड टाकली. यावेळी आरोपी ५२ पत्त्यांवर पैशांची पैज लावून जुगार खेळताना आढळून आले.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

साहित्य / वस्तू जप्त केलेली किंमत
नगदी रक्कम ₹१,७३,२३०/-
वाहने (चारचाकी व दुचाकी) ₹२४,२०,०००/-
मोबाईल संच ₹१,५७,०००/-
जुगार साहित्य ₹५०/-
एकूण किंमत ₹२७,५०,२८०/-

अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींची यादी

१. संजय ज्ञानेश्वर सामरे (वय ५०, रा. गोविंदपूर) – शेतमालक व अड्डा चालक

२. स्वप्नील ज्ञानेश्वरराव बालपांडे (वय ३२, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट)



३. शेख सलमान शेख रहमान (वय ३२, रा. स्टेशन फैल, वर्धा)

४. पंकज भारत बेलेकर (वय ३८, रा. समुद्रपूर)



५. अंकुश गजानन येलमुले (वय ४८, रा. लसनपूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा)

६. प्रवीण नारायण पाटील (वय ३३, रा. समुद्रपूर)

७. श्रीकृष्णा बबन राऊत (वय ३४, रा. समुद्रपूर)

८. भारत चंद्रकांत उंडे (वय ३४, रा. रंगारी वार्ड, हिंगणघाट)

९. सुनील विठ्ठलराव वरघणे (वय ४०, रा. अल्लीपूर)

१०. मुजीब शेरखाँ पठाण (वय ४५, रा. वायगाव हळद्या, ता. समुद्रपूर)

११. अमरसिंग गुरूबच्चनसिंग भादा (वय २६, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट)

१२. वसिम शकिल कुरेशी (वय ४३, रा. अल्लीपूर)

१३. अतुल रूपराव शिरभाते (वय ४२, रा. छागाणी नगर, जुना धामणगाव, जि. अमरावती)

१४. सूरज विजय आस्कर (वय २८, रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट)

१५. पंकज विठ्ठलराव देवतळे (वय ३८, रा. ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट)

१६. प्रवीण मधुकर चिडे (वय ४८, रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट)

१७. आशिष माधवराव देशमुख (वय २४, रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट)

१८. अनिकेट माधवराव वनकर (वय २३, रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट)

१९. शुभम श्याम अंबेरे (वय ३०, रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट)

महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या सर्व १९ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  सुशीलकुमार नायक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

  • ठाणेदार:  अनिल राऊत

  • गुन्हे प्रकटीकरण पथक (DB Team):

    • पोलीस हवालदार: नरेंद्र डहाके, श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, विनोद बुरिले, प्रवीण बोधाने, मुकेश येले.

    • पोलीस नाईक: नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी.

    • पोलीस शिपाई: सागर सांगोले, प्रमोद जाधव, राजेंद्र ढगे, कुणाल टोनपे, आकाश कुमरे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!