
पारडी पोलिसांची कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर (पारडी):
शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकमध्ये बॉयलर कोंबडीचा माल घेऊन जाणाऱ्या वाहनचालक आणि मजुराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पारडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा मुख्य आरापींना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात लूटलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
-
तारीख व वेळ: दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास.

-
प्रवासाची पार्श्वभूमी: फिर्यादी नंदू नामदेव डोंगरे (वय ३२, रा. खापरी, कुरडकर वार्ड नं. २, उमरेड, जि. नागपूर) हे त्यांच्या कंपनीच्या आयशर ट्रकमध्ये (क्र. MH 40 AG 1359) बॉयलर कोंबडीचा माल भरून घेऊन जात होते. त्यांच्यासोबत चालक जॉनी अंकुश वाघाडे (वय ४०, रा. उमरा) आणि मजूरी करणारे सागर फोकन मुंडल (वय २०, रा. विहीरगाव) हे देखील सोबत होते.
-
लूटमारीची वेळ: प्रवास सुरू असताना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महालक्ष्मी पेट्रोल पंपजवळील एका चहा टपरीवर हे सर्वजण चहा पिण्यासाठी थांबले होते.

पाच जणांकडून प्राणघातक हल्ला व लुटारूंचा सुळसुळाट
चहा टपरीवर थांबले असताना, मजूर सागर याच्यासोबत तिथे पाच अनोळखी इसम आले. त्या नराधमांनी फिर्यादी आणि मजुराला अचानक घेरून चाकूचा धाक दाखवला व जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील ५०० रुपये रोकड आणि ३ मोबाईल फोन असा एकूण ३५,५०० रुपयांचा मुद्देमाल बळच हिसकावून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांची तपासचक्रे आणि अटक सत्र
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहि्येच्या (भा.न्या.सं.) कलम ३१०(२), १२६२(२) तसेच सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पारडी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या आधारे कसून शोध घेऊन खालील आरोपींना बेड्या ठोकल्या:
-
राहुल मोहन चौधरी (वय १९, रा. जुनी मंगळवारी, घासबाजार चौक, ह.मु. स्वागत नगर, चर्चमागे, भांडेवाडी, नागपूर).

-
प्रियांशु उर्फ पांडा मंगळदास ठाकरे (वय २२, रा. आराधना नगर, भांडेवाडी, नागपूर).
गुन्ह्याची कबुली आणि जप्ती
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी हा जबरी चोरीचा गुन्हा त्यांच्या अन्य एका पाहिजे असलेल्या साथीदारासह आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या साथीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील ३५,००० रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन हस्तगत केले असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.
पोलीस पथकाचे यश
ही महत्त्वपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
विश्वास नांगरे पाटील (पोलीस आयुक्त )
नविनचंद्र रेड्डी (सह पोलीस आयुक्त)
वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रभाग)
नित्यानंद झा (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्र. ५)
रोहित ओव्हाळ (सहायक पोलीस आयुक्त, पारडी विभाग)
या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्रीमती नंदा मनगटे, पोउपनि अरविंद कोल्हारे, मपोउपनि राजकिरण डोके, पोलीस हवालदार संदीप लांडे, शैलेश कुंभुलकर, नापोअं. निलेश यादव, निखिल मोहीते, पोअं. धनराज उमरेडकर, योगेश बोरेकर व गौरव युवते यांनी या संपूर्ण तपासात आणि कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.




