चंद्रपुरात हातभट्टीवर छापा; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


चंद्रपूर: शहरातील जलनगर भागातील कंजर मोहल्ला परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीवर रामनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर २०२६) सकाळी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १,३४० लिटर सडवा व गावठी दारूसह दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील

दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता जलनगर भागातील कंजर मोहल्ला येथील दोन घरांमध्ये अवैधपणे गावठी दारूची विक्री होत असून बॅरलमध्ये सडवा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापेमारी केली.



  • पहिली कारवाई: कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड येथील बरखा रामप्रसाद कंजर हिच्या घरातून गावठी दारू बनविण्याच्या साहित्यासह ७१० लिटर सडवा आणि ०५ लिटर गावठी हातभट्टी दारू असा ७२,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



  • दुसरी कारवाई: जवळच असलेल्या निलू संतोष भाट (रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) हिच्या घरातून तसेच दारू विक्री करणाऱ्या सतिष मिलन जाधव याच्याकडून दारू बनविण्याचे साहित्य, ६०० लिटर सडवा आणि २५ लिटर गावठी हातभट्टी दारू असा ६३,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.



एकूण दोन्ही ठिकाणांहून १,३१० लिटर सडवा, ३० लिटर गावठी हातभट्टी दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा १,३६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित महिला व त्यांच्या हस्तकांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम  अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई?

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी पार पाडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्यासह आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, ब्ल्युटी साखरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज पोंदे आणि सुरज शेडमाके यांचा समावेश होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!