अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई: चिखलदऱ्यात गांजा जप्त, मंगरूळ दस्तगीरमध्ये अवैध रेती वाहतूक उघड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


‘ऑपरेशन कवच’चा तडाखा: चिखलदऱ्यात १४.५६ लाखांचा गांजा जप्त, मंगरूळ दस्तगीरमध्ये अवैध रेती वाहतूक उघड

अमरावती: अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कवच’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिसांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत गांजा लागवड व अवैध रेती वाहतुकीचे प्रकार उघडकीस आणले आहेत. पोलिस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.



१. चिखलदरा हद्दीत शेतात गांजा लागवडीवर छापा; १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की, कुलंगना खुर्द येथील एका इसमाने विक्रीच्या उद्देशाने आपल्या शेतात गांजाची झाडे लावली आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने संबंधित शेतावर छापा टाकला.



  • आरोपी: राजाराम ठाकूर धिकार (वय ४५ वर्षे, रा. कुलंगना, ता. चिखलदरा, जि. अमरावती).



  • कारवाईचा तपशील: शेतातील झोपडीसमोरील भागात विविध ठिकाणी लहान-मोठी गांजासदृश झाडे आढळून आली. रंग, गंध व गुणधर्मावरून ती गांजाचीच झाडे असल्याची खात्री पटली.

  • जप्त मुद्देमाल: मुळासह असलेली, तसेच ओलसर, सुकलेली व कापलेली अशी एकूण ३७ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या मुद्देमालाचे एकूण वजन २९.१२० किलोग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १४,५६,००० रुपये इतकी आहे.



  • गुन्हा नोंद: याप्रकरणी चिखलदरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३३१/२६ अन्वये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८(ब), (क) आणि २०(अ)(i)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. चंद्रभागा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक; ट्रॅक्टरसह कारवाई

दुसऱ्या कारवाईत, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सोनगाव खर्डा येथील चंद्रभागा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून ही वाहतूक रोखली.



  • जप्त वाहने: सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र. MH 32 P 3828) आणि त्यास जोडलेली विनाक्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली रेती भरलेली आढळून आली.

  • आरोपी: १) मुकेश विष्णूजी नेवारे (वय ३२ वर्षे, रा. सोनगाव, ता. धामणगाव रेल्वे) आणि २) आकाश सतीशराव गायकवाड (रा. सोनगाव, ट्रॅक्टर मालक – फरार).

  • गुन्हा नोंद: दोन्ही आरोपींविरुद्ध मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम कलम ३, ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई?

पोलिस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. या पथकात सपोनि गणपत काळुसे, ठाणेदार चिखलदरा, पोउपनि सागर हटवार, पोउपनि रोहीत कुदळे यांच्यासह अंमलदार शिवाजी घुगे, दिनेश कनोजिया, युवराज सोळंके, सुधीर बावणे, चेतन दुबे, सचिन गायधने आणि चालक हर्षद घुसे यांचा समावेश होता.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!