
नागपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई: ३.२८ कोटींची रोकड जप्त ३.७४ कोटींच्या जबरी चोरीचा छडा

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: ३.७४ कोटींच्या जबरी चोरीचा छडा; मध्य प्रदेशातून ३ आरोपींना अटक व ३.२८ कोटी रुपये जप्त
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत शांतीनगर हद्दीत घडलेल्या ३.७४ कोटी रुपयांच्या जबरी चोरीचा उलगडा केला आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक करून शेतात लपवून ठेवलेली ३,२८,००,०००/- रुपयांची रोकड जप्त केली आहे.

घटनेचा तपशील व लूट
-
हवाला रक्कम घरी ठेवली: ‘माँ अर्बुदा ट्रेडिंग कंपनी’चे मालक सोहनलाल मोतीलाल परमार (वय ४०, रा. जालना) यांच्या सांगण्यावरून फिर्यादी सुरेशकुमार पुखराज परमार (वय ३१, रा. तुलसी नगर, शांतीनगर, नागपूर) यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हवालाचे ३,७४,००,०००/- रुपये आपल्या घरी आणून ठेवले होते.

-
गाडीत रक्कम भरणे: १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १:०० वाजता जालन्याहून चालक मोहन वाळके हे ‘महिंद्रा एक्सयुव्ही ३ एक्सओ’ (क्र. MH-20-HH-2369) गाडी घेऊन आले. फिर्यादी तसेच ललितकुमार आणि सिद्धांत निकम यांनी ५ ते ६ बॅगमध्ये रक्कम भरून गाडीच्या डिक्की व सीटखाली ठेवली.

-
हल्ला व जबरी चोरी: पहाटे १:३० वाजता ललितकुमार पार्किंगचे गेट उघडून मोहन वाळके गाडी बाहेर काढत असताना, पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा कारमधून ३-४ अज्ञात आरोपी आले. त्यातील दोघांनी हातात चाकू घेऊन ललितकुमार यांच्या हातावर वार केला व डोळ्यांत स्प्रे मारला. इतरांनी लाकडी काठी व हातबुक्क्यांनी मारहाण करत मोहन वाळके यांच्या डोळ्यांत स्प्रे मारला आणि चाकूचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले.
-
गाडी सापडली, रोकड गायब: आरोपी रकमेसह पळाल्यानंतर फिर्यादींनी मालक व पोलिसांना माहिती देत जीपीएस ट्रॅकरच्या आधारे गाडीचा पाठलाग केला. खैरी गावाजवळ निर्जनस्थळी लाईट सुरू व दरवाजे उघड्या अवस्थेत गाडी मिळाली, मात्र आतील रोकड चोरीस गेल्याचे आढळले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


तपास, अटक व मुद्देमाल जप्ती
-
१,००० ते १,२०० सीसीटीव्हीची तपासणी: घटनेची माहिती मिळताच (पहाटे ४:३० च्या सुमारास) गुन्हे शाखा व शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सुमारे १,००० ते १,२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपींनी वापरलेली मारुती सुझुकी ब्रेझा (क्र. MH-34-GJ-9019) ही कार गुन्हे शाखा युनिट क्र. ०२ ने शोधून काढली.
-
बालाघाट रेल्वे स्टेशनवर कार: तपासात ही गाडी बालाघाट (म.प्र.) रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. गाडीचे मालक शुभमकुमार शिवकुमार सिंग यांनी ती शुभम कमल डहरवाल (वय २६, रा. बम्हणी, ता. तिरोडी, जि. बालाघाट) याला भाड्याने दिल्याचे व त्यात जीपीएस ट्रॅकर असल्याचे स्पष्ट झाले.

-
आरोपींना अटक: रेल्वे स्टेशन पार्किंगच्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी १) चंद्रकांत दिनेश बगेल (वय २६, रा. चिखलीबांधा, जि. बालाघाट) आणि २) रजनिकांत उर्फ कृष्णा अनिल चंद्रवार (वय २५, रा. चिखलीबांधा, जि. बालाघाट) यांना ताब्यात घेतले.
-
शेतातून रोकड जप्त: चौकशीत त्यांनी चोरीची रक्कम शुभम डहरवाल याचा नातेवाईक ३) अरविंद दिनेश डहरवाल (रा. डोरलीमाल, ता. वाराशिवनी, जि. बालाघाट) याच्याकडे दिल्याचे व त्याने ती शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी शेतातून ३,२८,००,०००/- रुपये हस्तगत करून अरविंद डहरवाल यालाही अटक केली.
-
कोठडी व आयकर विभागाला माहिती: अटक तिन्ही आरोपींना २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाहिजे असलेला आरोपी ४) शुभम कमल डहरवाल व इतर ३ साथीदारांचा शोध सुरू असून, जप्त रक्कम व आर्थिक व्यवहाराबाबत आयकर विभागाला लेखी पत्र देऊन कागदपत्रे पुरवण्यात आली आहेत.
कारवाईतील पोलीस पथक व मार्गदर्शन
ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार आणि सायबर पथकाने संयुक्तपणे पार पाडली:
-
मार्गदर्शन: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता शाहु (उत्तर प्रभाग), राजेंद्र दाभाडे (गुन्हे), पोलीस उप आयुक्त दीपक अग्रवाल (डिटेक्शन), राहुल मदने (परि. क्र. ३), सहा. पोलीस आयुक्त भारत क्षिरसागर (अती. कार्य. गुन्हेशाखा) आणि महेश चव्हाण (लकडगंज विभाग).
-
अधिकारी व अंमलदार: वपोनि. गजानन तामटे, मपोनि. शुभांगी देशमुख, संजीवनी थोरात, पोनि. अतुल मोहनकर, विनायक गोल्हे, भरत कऱ्हाडे, सपोनि. चेतन बोरखडे, नितीन चुलपार, गणेश कदम, राजाभाऊ जाधव, मंगला हरडे, पोउपनि. मधुकर काठोके, अमित देशमुख, सागर अरबट, प्रशांतराज जाधव, अमित कुंभार, सफौ. राजेश टापरे, संतोषसिंग ठाकूर, पोहवा. प्रवीण गोरटे, संतोष यादव, दिनेश लांजेवार, स्वामी डोकरे, गोपीचंद निनावे, अनंता नान्हे, मनोज नेवारे, विजय श्रीवास, दिनेश डवरे, सुरेश तेलेवार, कमलेश गणेर, कमलेश गहलोद, गणेश ठाकरे, रूपेश नानवटकर, योगेश महाजन, रोशन तिवारी, नितीन वर्मा, विलास कोकाटे, शंभुसिंग किरार, पोअं. नितीन बावणे, उमेश पडोळे, महेंद्र सेलुकर, गणेश दोनाडकर, दीपक दासरवार, जितेश रेड्डी, चंद्रशेखर डेकाटे, दीपक लाकडे, रोहित काळे, आशिष धंदरे, विवेक श्रीपाद, राहुल कुसरामे, अभय ढोणे, कुणाल गेडाम, स्वप्नील खोडके, मालोजी धुळगंडे, चापोहवा. सुमित पाटील, किरण केंद्रे तसेच सायबर पथकातील पोउपनि. विवेक झिंगरे, पोहवा. अनंता क्षिरसागर, चंद्रशेखर राघोर्ते, पोअं. पराग ढोक, धीरज पंचभावे व मिथुन नाईक.


