अवैध वाळू वाहतुकीवर भिवापूर पोलिसांची मोठी कारवाई: ३ गुन्हे दाखल, १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैध वाळू वाहतुकीवर भिवापूर पोलिसांची मोठी कारवाई: ३ गुन्हे दाखल, १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवापूर: भिवापूर पोलिसांनी अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ गुन्हे नोंदवले असून १ कोटी २१ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी २ जुलै २०२६ रोजी भिवापूर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून अवैध रेती वाहतुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा भगवानपूर बकरजवळ नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी संशयास्पद वाटणारे ३ मोठे ट्रक (१६ चक्का) अडवले.

वाहनांची तपासणी आणि जादा रेतीचा साठा पंचसमक्ष या तिन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये रेती (वाळू) भरलेली आढळली. वाहन चालकांकडे रेती परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडील परवान्यात नमूद क्षमतेपेक्षा जास्त रेती असल्याचे पोलिसांना संशय आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून या वाहनांचे वजन करण्यात आले. वजनानंतर तिन्ही गाड्यांमध्ये परवान्यापेक्षा अतिरिक्त रेती असल्याचे स्पष्ट झाले.



  • ट्रक क्र. १ (MH 12 SF 5577): परवान्यापेक्षा २.९८ ब्रास अतिरिक्त रेती.

  • ट्रक क्र. २ (MH 12 SF 4477): परवान्यापेक्षा ३.७० ब्रास अतिरिक्त रेती.



  • ट्रक क्र. ३ (MH 40 CM 6597): परवान्यापेक्षा १.८६ ब्रास अतिरिक्त रेती.

१ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी तिन्ही ट्रक आणि त्यामधील एकूण ३१.५४ ब्रास रेती असा एकूण १,२१,५६,०००/- (१ कोटी २१ लाख ५६ हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



आरोपींची माहिती आणि गुन्हे दाखल या प्रकरणात पकडण्यात आलेले सर्व आरोपी अमरावती येथील रहिवासी आहेत:

  • वाहन क्र. १ चा चालक: सय्यद जावेद सय्यद साबीर (रा. अमरावती)

  • वाहन क्र. २ चा चालक: सय्यद जमीर सय्यद वजीर (रा. अमरावती)

  • वाहन क्र. १ व २ चा मालक: मोहम्मद शेख अब्दुल रझाक (रा. छाया नगर, अमरावती)

  • वाहन क्र. ३ चा चालक: सय्यद अकील सय्यद सिद्दीक (रा. अमरावती)

या सर्व आरोपींविरुद्ध भिवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ४९, ३(५) सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम आणि सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत प्रत्येकी १ असे एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!