यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा येथील कुख्यात आरोपीस केले हद्दपार….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ– पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीतील रामदेवबाबा ले आउट पांढरकवडा येथे वास्तव्यास असलेला इसम नामे विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार वय ४१ वर्षे याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिलेख २०१३ सालापासुन असुन त्याचे विरुध्द पांढरकवडा पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात लोकसेवक यांचेवर हमला करणे, शासकीय कार्यालयामध्ये जावुन हमला करणे व शांतता भंग करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे, शासकीय वस्तु चोरी करणे, दंगली करणे, दंगलीमध्ये सहभागी होवुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, अपंग सरकारी कर्मचारी /अधिकारी यांना धमकाविणे, आमजनतेला मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी शिविगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद होते त्याने पांढरकवडा शहर व परीसरात दहशतीचे वातारवण निर्माण केले असल्याने व त्याचे विरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस तो जुमानत नसल्याने ठाणेदार पांढरकवडा यांनी त्यास महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सो. यवतमाळ यांचे मार्फतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी केळापुर यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावातील जाब देणार विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार याचा गुन्हेगारी अभिलेख पडताळुन तो शासकीय अधिकारी कर्मचारी यांचेवर हमला करणे, अश्लिल शिविगाळ करणे, मारहाणे करणे, दंगा करणे, शासकीय संपत्तीचे नुकसान करणे असे विघातक कृत्ये वारंवार करुन लोकांचे जिवितास, मालमत्तेस व सामाजिक स्वास्थास धोका निर्माण केल्याने व त्याची गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने सार्वजनिक हिताचे दृष्टीकोणातुन सदर प्रस्तावास मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी केळापुर यांनी जाब देणार  विकेश ऊर्फ विक्की विठठलीराव देशटटीवार वय ४१ वर्षे रा. रामदेवबाबा ले आउट पांढरकवडा ता. केळापुर जि. यवतमाळ यास ०२ वर्षाकरीता यवतमाळ जिल्हयातुन हद्दपारीचे आदेश दिनांक २९/०८/२०२३ रोजी पारीत केले असल्याने त्यास यवतमाळ जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. आगामी सन उत्सव शांततेत पार पाडण्याचे दृष्टीने व जिल्हयातील गुन्हेगारीस कायमस्वरुपी आळा घालण्या करीता समाजात दहशत माजविणारे तसेच शरीराविरुध्द, संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे गुन्हेगारांचे अभिलेख अद्यावत करुन त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए., म.को.का. हद्दपार अशा प्रभावी कारवाई करीता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सर्व पो.स्टे. प्रभारी यांना दिलेले आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजंणे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक पांढरकवडा अमोल माळवे, सपोनि प्रविण लिंगाडे, पोशि राजु बेलेवार पोस्टे पांढरकवडा, पोउपनि धनराज हाके, पोहवा बालाजी ठाकरे, पोना राम पोपळघट सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!