
जबरदस्तीने चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १२ तासांच्या आत अटक
नागपूर
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास, फिर्यादी श्रीमती सुशिला मोरेश्वर पवनीकर (वय ६९ वर्षे, रा. प्लॉट. ७४६, निकालस मंदिर रोड, सुदर्शन चौक, नागपूर) या हार-फूल खरेदीसाठी पायी दुकानात जात होत्या.

पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील अपेक्स मेडिकल स्टोअर्ससमोर, निकालस मंदिर रोड येथे एका अज्ञात दुचाकीस्वाराने मागून येऊन त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची आणि ₹५०,०००/- किमतीची सोन्याची साखळी (चैन) जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, फिर्यादी यांनी प्रसंगावधान राखून चोराच्या हाताला धक्का दिल्याने साखळी चोरी झाली नाही आणि आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०९(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई

गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास करून आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी पवन विजय पंजवानी (वय ३२ वर्षे, रा. भाजीमंडी, महाल, नागपूर) याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील कारवाईसाठी त्याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मार्गदर्शन व पथक

ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
-
राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)

-
दीपक अग्रवाल (पोलीस उप-आयुक्त, डिटेक्टिव्ह)
-
वैभव जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा)
तसेच, युनिट क्र. ३ चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली.




